आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lok Sabha 2019: महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, राधाकृष्ण विखे पाटलांनी पाठ फिरवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. परंतु, विधानसभेत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीचा तिढा होता. अखेर तो तिढा शनिवारी मिटला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसह समविचारी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते. काँग्रेस महाआघाडीच्या घोषणेसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यावेळी विखे पाटील आपल्या मतदारसंघात होते. त्यामुळे, मुंबईत झालेल्या परिषदेत ते पोहोचलेच नाहीत. मुलाच्या भाजप प्रवेशानंतर  राधाकृष्ण विखे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा होती. परंतु, नुकतेच त्यांनी स्वतः ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. तरीही महाआघाडीच्या घोषणेच्या वेळी त्यांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...