Home | National | Delhi | lok sabha election 2019 mahaghadi news

29 पैकी 16 पक्षांनी एनडीए साेडले; 4 पक्षांचा इशारा; आता 40 पक्ष नरेंद्र मोदींच्या विराेधात

दिव्य मराठी | Update - Mar 13, 2019, 11:11 AM IST

मोदी पीएम झाल्यावर एनडीएत पक्ष कमी झाले, भाजपचा दावा : अजूनही 42 पक्ष साेबत

 • lok sabha election 2019 mahaghadi news

  नवी दिल्ली - 2013मध्ये जेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार केले तेव्हा 29 पक्ष एनडीएसाेबत हाेते. तेव्हा भाजपलाच 282 तर एनडीएतील इतर पक्षांना 54 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर काही पक्ष एनडीएत आले. मोदी पीएम झाल्यावर 5 वर्षांत 16 पक्षांनी एनडीए साेडले. 4 पक्ष भाजपवर नाराज असून एनडीए साेडण्याची धमकी देत आहेत.


  केव्हा, काेणी, का साेडले?
  लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा जनहित काॅंग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीए साेेडले. कुलदीप विश्नोई म्हणाले, भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहेत. डिसेंबर 2014 मध्ये तामिळनाडूतील एमडीएमकेने एनडीए साेडले. चीफ वायको म्हणाले, भाजप तामिळच्या विराेधात काम करत आहे. त्यानंतर विजयकांत यांची डीएमडीके व एस रामदास यांची पीएमकेने तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी साथ साेडली. 2019 च्या निवडणुकीपूर्वी एनडीएत त्यांना 7 जागा दिल्या. तेलगू स्टार पवन कल्याणची जन सेना पार्टीचाही एनडीएकडून अपेक्षा भंग झाला.


  2016मध्ये केरळचे दाेन माेठे पक्ष रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी बोल्शेव्हिक व जनाधिपत्या राष्ट्रीय सभेने एनडीए साेडले. 2017 मध्ये महाराष्ट्रातील राजू शेट्टीच्या स्वाभिमानी पक्षाने शेतकऱ्यांच्या विषयावरून एनडीए साेडले. 2018 मध्ये राज्यसभेत न पाठवल्यामुळे नाराज हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जितन राम मांझी महाआघाडीतून बाहेर पडले. नागालंॅड निवडणुकीत भाजपने एनडीपीपीशी युती केल्याने 15 वर्षे जुनी एनपीएफ एनडीएतून बाहेर पडली.कर्नाटक निवडणुकीत केपीजेपी जेडीएससाेबत गेली. आंध्रला विशेष राज्याच्या दर्जा न दिल्याने नाराज चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडले.जागावाटपात दुर्लक्षामुळे उपेंद्र कुशवाहा वेगळे झाले. गोरखाने फसवणूक केल्याचा आराेप लावून गोरखा जनमुक्ती मोर्चा साेडला. काश्मीर मुद्द्यावर पीडीपी व नागरिकता बिलावरुन आसाम गण परिषदेने भाजपतून साेडचिठ्ठी घेतली.


  4 पक्षांकडून अजूनही एनडीए साेडण्याचा इशारा
  1. उत्तर प्रदेशात अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल सन्मान मिळत नसल्याने नाराज आहेत.
  2. यूपीत आेपी राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी योगी सरकारवर नाराज आहे.
  3. मेघालयाचे मुख्यमंत्री कोर्नाड संगमा यांनी नागरिकत्व विधेयकावर वेगळी भूमिका घेतली.
  4. महाराष्ट्रातील जागावाटपात स्थान न दिल्याने रामदास आठवले नाराज आहेत.

Trending