आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lok Sabha Election 2019 Phase 7: Live Updates Of Seventh Phase Voting In 59 Constituencies, 13 In West Bengal

Election Breaking/ सातव्या टप्प्यात 60 % मतदान, नरेंद्र मोदींसह 918 उमेदवार रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदारसंघांसाठी मतदान होत आह. सातव्या टप्प्यात 918 उमेदवार मैदानात उतरले आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54 % मतदान झाले आहे. झारखंडमध्ये 67, बिहारमध्ये 51  तर मध्यप्रदेशमध्ये 62 % मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये या टप्प्यातही हिंसाचार भडकला. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शत्रुघ्न सिन्हा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकुर, भोजपुरी अभिनेते रविकिशन, सनी देओल, सुखबीर बादल, हरसिमरत कौर, शिबू सोरेन, पवन कुमार बंसलसारखे मोठे नेते या टप्प्यात मैदानात आहेत.


या टप्प्यात बिहारच्या 8, झारखंडच्या 3, मध्यप्रदेशच्या 8, उत्तरप्रदेशच्या 13, प. बंगालच्या 9, हिमाचल प्रदेशच्या 4, पंजाबच्या 13 आणि चंडीगडच्या 1 जागेसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशमध्ये देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, धार, इंदौर, खरगोन, खंडवाजागेंवर मतदान आहे. या टप्प्यात मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गोव्यातील पणजी विधानसभेच्या जागेसाठीही मतदान होत आहे. याशिवाय तमिळनाडुच्या चार विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे.

 

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान ?

राज्य9 पर्यंत10 पर्यंत  11 पर्यंत  12 पर्यंत  
बिहार (8)10%11%18%19%
हिमाचल (4)1%11%13%28%
मध्यप्रदेश (8)7%13%14%29%
पंजाब (13)5%10%11%23%
उत्तरप्रदेश (13)6%10%11%23%
बंगाल (9)11%14%16%32%
झारखंड (3)13%15%17%31%
चंडीगड(1)10%10%10%

22%

 

राज्य1 पर्यंत 2 पर्यंत  3 पर्यंत  
बिहार (8)36%36%37%
हिमाचल (4)29%44%46%
मध्यप्रदेश (8)32%46%47%
पंजाब (13)28%38%42%
उत्तरप्रदेश (13)26%37%39%
बंगाल (9)36%50%52%
झारखंड (3)42%53%57%
चंडीगड (1)22%37%38%

 

राज्य4 पर्यंत  5 पर्यंत   2014 मध्ये मतदान
बिहार (8)46%51%52.06%
हिमाचल (4)56%58%64.45%
मध्यप्रदेश (8)59%62%67.13%
पंजाब (13)48%54%70.63%
उत्तरप्रदेश (13)46%49%55.2%
बंगाल (9)63%68%79.24%
झारखंड (3)64%67%68.87%
चंडीगड (1)51%51%73.7%

निवडणूक अपडेट्स


> भाजपचे जेष्ट नेते मुरली मनोहर जोशींनी वाराणसीत मतदानाचा हक्क बजावला.

> पटनामध्ये राजद नेते तेज प्रताप यादव यांच्या कारवर हल्ला. त्यांनी आरोप केला आहे की, त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे.
> हिमाचलच्या कलपामध्ये 102 वर्षीय श्याम सरण नेगी यांनी मतदान केले. त्यांनी 1951 मध्ये पहिल्यांदा मतदान केले होते.
> बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील चंदौरा गावात लोकांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तोडली, तसेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या गाडीच्या काचा फोडल्या. स्थानिक लोक म्हणाले, ‘‘रस्ता नाही तर व्होट नाही.’’ 

> पंजाबच्या बादल गावात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आरोप लावला आहे की- "काँग्रेसने बाहेरून गुंड आणले आहेत. त्यांच्या गुंडानी शनिवारी कार्सची चेंकिंग केली होती. आम्ही अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली आहे, पण अजून कोणतीच कारवाई झालेली नाहीये. बठिंडामध्ये आमच्या कार्यकर्ता टीटू रंधावावर हल्ला झाला आहे."

> हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल आणि त्यांचे पुत्र अनुराग ठाकुर यांनी हमीरपूरमध्ये मतदान केले. 
> क्रिकेटर हरभजन सिंगने जालंधरच्या गरही गावात मतदान केले.
> बिहारचे उप मुख्यमंत्री सुशील मोदींनी पटनामध्ये मतदानाचा हक्क बजावला.
> बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटनामध्ये मतदान केले. मतदानानंतर ते मीडियाशी बोलताना म्हणाले- > निवडणूक इतकी लांब नसावी, सात टप्पे खूप जास्त आहेत. त्यांनी मतदान मे महिन्यात करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले- विडणूका गर्मी वाढण्यापूर्वीच व्हायला हव्या होत्या. यावर सर्व पक्षांची बैठक व्हायला हवी.
> मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध मतदान केले.
> बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान हिंसाचार जाळपोळ झाली होती.

 

2014 मध्ये एनडीएने 40 जागेंवर विजय मिळवला होता
या टप्प्यात ज्या 59 जागेंसाठी मतदान होत आहे, त्यापैकी 2014 मध्ये एनडीएने 40 (भाजपा- 33, अकाली दल- 4, रालोसपा-2, अपना दल-1) जागेंवर विजय मिळवला होता. मागील लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष रालोसपा भाजपसोबत होते, पण नितीश कुमार यांच्या जनता दलने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा ठरवले होते. बंगालच्या ज्या 9 जागेंसाठी मतदान होत आहे, त्यापैकी सगळ्या तृणमूलने जिंकल्या होत्या. या 59 जागेंसाठी आपने 4, काँग्रेसने 3, झामुमोने 2 आणि जदयूने 1 जागेवर विजय मिळवला होता.


बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या 710 तुकड्या तैणात
बंगालमध्ये मागील 6 टप्प्यात झालेला हिंसाचार पाहून येथे केंद्रीय सुरक्षादलाच्या 710 तुकड्यांना तैणात करण्यात आले आहे. तर, 512 क्विक रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. 710 तुकड्यांमध्ये 147 तुकड्या कोलकाता पोलिसांच्या अधिकारामध्ये तैणात असेल.


7 व्या टप्प्यात हे मोठे चेहरे मैदानात
 

नरेंद्र मोदी: पंतप्रधान नरेंद्रमोदी मागील वेळेप्रमाणे यावेळसही उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. सपा-बसपाने त्यांच्याविरूद्ध शालिनी यादव यांना मैदानात उतरवले आहे. तर, काँग्रेसने मागच्या वेळी मोदींविरूद्ध निवडणूक लढलेले अजय राय यांना परत एकदा तिकीट दिले आहे. 

 

शत्रुघ्न सिन्हा: अभिनेते आणि भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब जागेवरून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी 2 वेळेस ते याच जागेवरून खासदार म्हणून निवडणून आले आहेत. भाजपाने सिन्हा यांच्या विरूद्ध केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरवले आहे.

 

अनुराग ठाकुर: भाजप खासदार अनुराग ठाकुर हिमाचलच्या हमीरपूर जागेवरून लढवत आहेत. ते 2008 पासून सगल येथून निवडणूक जिंकत आले आहेत. या जागेवरून त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमलदेखील 3वेळा खासदार झाले आहेत. हमीरपूरहे भाजपचा गड आहे. 1998 पासून येथे भाजपची सत्ता आहे. 

 

सनी देओल: अभिनेता सनी देओलला भाजपने गुरदासपूरवरून तिकीट दिले आहे. ही त्याची पहिली निवडणूक आहे. काँग्रेसने या जागेवरून विद्यमान खासदार सुनील जाखड यांना तिकीट दिले आहे. गुरदासपूरवरून अभिनेते विनोद खन्ना 4 वेळेस खासदार झाले आहेत. पण त्यांच्या निधनानंतर सुनील जाखड पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.

 

सुखबीर बादल: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे सुपूत्र सुखबीर बादल फिरोजपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बादल तीनवेळस सलग फरीदकोटवरून खासदार म्हणून निवडणून आले आहेत. काँग्रेसने यावेळी फिरोजपूरवरून विद्यमान खासदार शेर सिंग घुबाया यांना तिकीट दिले आहे. घुबाया या जागेवर अकाली दल पक्षातून 2 वेळेस खासदार म्हणून निवडणून आले आहेत. मार्च 2019 मध्ये घुबाया अकाली दल सोडून काँग्रेसमध्ये सामिल झाले होते. 

 

हरसिमरत कौर बादल: सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल बठिंडावरून लढत आहेत. त्या या जागेवरून सलग 2 वेळा खासदार झाल्या आहेत. काँग्रेसने या जागेसाठी विद्यमान आमदार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांना तिकीट दिले आहे. 

 

शिबू सोरेन: शिबू सोरेन आपला मतदारसंघ दुमकामधून निवडणूक लढवत आहेत. ते 1980 पासून 2014 पर्यंत 8 या जागेवरून खासदार झाले आहेत. या दरम्यान ते 2 वेळेस निवडणूक हारलेदेखील आहेत. भाजपने शिबू यांच्या विरूद्ध सुनील सोरेन यांना मैदानात उतरवले आहे. 

 

आतापर्यंत 6 टप्प्यत सरासरी 66.88% मतदान

 

 

टप्पा    जागा   कधी झाले मतदान मतदानाची टक्केवारी
पहिला     91              11 एप्रिल   69.5%
दुसरा 9518 एप्रिल69.44%
तिसरा 11723 एप्रिल68.4%
चौथा 71 29 एप्रिल65.51%
पाचवा5106 मे64%
सहाव्वा5912 मे63.43%