आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानमध्ये निवडणूक : मौलवी, शुक्रवार किंवा सणाच्या दिवशी मतदान नाही : आयोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - मौलवी आणि मुस्लिम समाजातील काही नेत्यांसह काँग्रेस, सपा, तृणमूल, आप यांनी रमजान महिन्यातील निवडणूक कार्यक्रमावर आक्षेप घेत तारखा बदलण्याची मागणी केली आहे. रमजानमध्ये निवडणूक घेणे चुकीचे, भाजपला यामुळे फायदा हाेईल, असे विराेधी पक्षांनी म्हटले आहे. असे असले तरी समाजातील एक वर्ग या आक्षेपाशी सहमत नाही. दुसरीकडे, निवडणूक आयोग म्हणाले की, शुक्रवार किंवा सणाच्या दिवशी मतदान नाही. रमजानच्या पूर्ण महिन्यात निवडणूक नसावी, असे होऊ शकत नाही. 


समाजवादी पक्षाचे नेते व अबू आझमी यांच्यासह  आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी मौलवींच्या मतास सहमती दर्शविली. मात्र, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी रमजानमध्ये मुसलमान काम करत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. आपण रमजानमधील निवडणुकीचे स्वागत करतो, असे ओवेसी म्हणाले.


देशभरात रमजानमध्ये १६९ जागांसाठी मतदान, यात उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगालमधील मुस्लिमबहुल जागा फक्त १४ आहेत.
देशातील २०
टक्क्यांहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या एकूण ७२ जागा आहेत. येथे मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात. उत्तर प्रदेश, बिहार आणि प.बंगालमध्ये अशा एकूण ४७ जागा आहेत. रमजानच्या महिन्यात पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यात ४७ पैकी १४ जागी मतदान होणार आहे. इतर जागी त्यापूर्वीच मतदान होईल.
आकड्यांद्वारे समजून घेऊ रमजानवरून सुरू झालेल्या राजकारणातील सत्य... 


उत्तर प्रदेश : एकूण जागा ८०, त्यापैकी रमजानमध्ये ४० जागांसाठी मतदान, यात मुस्लिमबहुल जागा ६  
हे मतदारसंघ : लखनऊ,बाराबंकी, कैसरगंज, बहराईच, वाराणसी, डुमरियागंज. यापैकी २६ जागांवर रमजानपूर्वीच मतदान होईल.  मागील वर्षी कैराना मतदारसंघात रमजानमध्ये पोटनिवडणूक झाली. येथे ४९ हजार मतांनी भाजपचा पराभव झाला होता.


प. बंगाल : एकूण जागा ४२  त्यापैकी रमजानमध्ये २४ जागांसाठी मतदान, यात मुस्लिमबहुल जागा ४    
हे मतदारसंघ : उलुबेरिया २२%, मथुरापूर २१%, जाधवपूर २०%, डायमंड हार्बर ३३%. राज्यात मुस्लिमबहुल एकूण जागा १७ आहेत. ४५%पेक्षा जास्त मुस्लिमबहुल ५ जागांसाठी रमजानपूर्वीच मतदान.


बिहार : एकूण जागा ४०, त्यापैकी रमजानमध्ये २१ जागांसाठी मतदान, यात मुस्लिमबहुल जागा ४   
हे मतदारसंघ : मधुबनी २४%, सीतामढी २१%, पूर्व चंपारण्य २०%, प. चंपारण्य २१%. राज्यात २०%हून जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या एकूण जागा ८ आहेत. त्यापैकी ४ जागांवर रमजानपूर्वीच मतदान होईल.

बातम्या आणखी आहेत...