आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

मैदानात उतरलेल्या नेत्यांचे शब्द, जे निवडणुकीला देतात रोज नवा रंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने 261 आणि भाजपने 203 जागांवर आपापले उमेदवार घोषित करून टाकले आहेत. काही नेता स्वत:ची उमेदवारी ही घोषित केल्यासारखेच मानून प्रचारात उतरलेले आहेत. निवडणूक ज्वर वाढतोय आणि अशातच दावे-प्रतिदावे यांचा रंग गडद होऊ लागले आहेत. आता राजकीय होळी-धुळवडीचा रंग खुलू लागलाय.
बंगळुरू दक्षिण -
कर्नाटकात भाजप सत्तेवर होते आणि येडुयरप्पा मुख्यमंत्रीपदी होते, तेव्हा त्यांनी नंदन नीलेकणी यांची प्राईड आॅफ कर्नाटक अशी स्तुती केली होती. आता काळ पूर्ण बदललाय. आता अनंतकुमार यांच्या समोर कॉंग्रेसकडून उभे राहिलेल्या नीलेकणी यांचे तगडे आव्हान उभे राहिले आहे. नीलेकणी भाजपवर टीकेची झोड उठवितानाच आपण राबविलेल्या आधारकार्ड योजनेची टीमकी वाजवित आहेत. येथून पाचवेळा लोकसभेत गेलेले अनंतकुमार म्हणतात की, नीलेकणी यांना खरेतर त्यांच्या आधार योजनेवर गर्व नको तर लाज बाळगणे गरजेचे आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा बंगळुरूच्‍या राजकारणा विषयी...