आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Record Break Voting

ANALYSIS: वाचा, कोणत्या पक्षाला होईल रेकॉर्डब्रेड मतदानाचा लाभ, कोणाचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. देशभरासह विदर्भातही मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तब्बल सरासरी 62.36 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. भर उन्हाळ्यातही रेकॉर्डब्रेक मतदान कसे काय झाले? याचा लाभ कोणत्या राजकीय पक्षाला होईल? याचा फटका कुणाला बसेल? हे जाणून घेण्यासाठी काय म्हणाले राजकीय विश्लेषक वाचा खालिल मुद्द्यांमध्ये...
- गेल्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या दुरुस्तीची मोहिम व्यापक स्वरूपात राबविली होती. त्यामुळे मतदान याद्यांमधील एकापेक्षा जास्त वेळा येणारी नावे वगळण्यात आली आहे. याद्यांमधील नावांची संख्या कमी झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. उदा- मतदान यादीत एक हजार लोकांची नावे असतील आणि पाचशे जणांनी मतदान केले तर 50 टक्के मतदान झाले असे म्हणता येईल. परंतु, यादितील एका पेक्षा जास्त असलेली नावे वगळली तर पाचशे लोकांनी मतदान केल्यावर निश्चितच टक्केवारी वाढेल.
- भारतीय राजकारणातील प्रमुख दोन राजकीय पक्षांपैकी भाजपने पहिल्यांदाच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांचा युवकांमध्ये मोठा करिश्मा असल्याचे दिसून येते. त्यामुळे युवकांनी उत्साहाने मतदानात सहभागी होत टक्केवारी वाढविली आहे.
- नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज मुस्लिमांनी एकजुटीने त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी समाजाने त्यांच्या बाजूने एकजुटीने मतदान केल्याने टक्केवारी वाढली आहे.
- दिल्लीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचा लाभ कुणाला होईल याबाबत विश्लेषकांचे एकमत नाही. याचा लाभ भाजपला होईल असे काही सांगतात तर काही म्हणतात याचा लाभ आम आदमी पक्षाला होणार आहे. कॉंग्रेसला याचे नुकसान सहन करावे लागेल, यावर मात्र विश्लेषक ठाम आहेत.
- दिल्लीकरांचा कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षावर रोष आहे. परंतु, जर मध्यमवर्गीयांनी 'आप'ला पुन्हा एक संधी देण्याचा विचार केला असेल तर याचा फटका कॉंग्रेस आणि भाजपला बसेल. परंतु, जर रोष कायम असेल तर याचा लाभ भाजपला होणार आहे.
- शहरांमधील मतदानात वाढ झाल्याचा लाभ सुधारक राजकीय पक्षांना होऊ शकतो. शहरी भागांमध्ये नरेंद्र मोदी यांची चांगली प्रतिमा रुजली असल्याचे दिसून येते.
- यापूर्वीच्या निवडणूक निकालांचा विचार केला तर वाढलेल्या मतदानाचा लाभ भाजपला झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जर मतदानात वाढ झाली असेल तर त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते.