आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live Updates: भाजपची 300 हून अधिक जागा मिळवण्याकडे कूच, मोदींनी केली इंदिरा गांधींची बरोबरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. यात सर्वप्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात आली. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत 7 टप्प्यांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. देशभर सरासरी 67.11% मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मतदानाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. विशेष म्हणजे, 10 पैकी 9 एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एडीएला स्पष्ट बहुमताचे भाकित वर्तवण्यात आले होते. प्राथमिक निकाल समोर आले त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

मोदींनी केली इंदिरा गांधींची बरोबरी
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळा तर इंदिरा गांधी यांनी दोन वेळा काँग्रेसला बहुमत मिळवून सत्ता स्थापित केली होती. नेहरुंनी 1952, 1957 आणि 1962 ची निवडणूक जिंकली होती. तर इंदिरा गांधींनी 1967 आणि 1971 मध्ये बहुमत मिळवले होते. सलग दोनवेळा जिंकून नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींची बरोबरी केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वात 282 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप 300 चा आकडा पार करेल असे अंदाज आहेत.


Live Updates

- मध्य प्रदेशच्या गुना येथून काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव, भाजपचे कृष्णपाल सिंह 1.24 लाख मतांनी विजयी
- भोपाळ येथून काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा पराभव, प्रज्ञा ठाकूर यांच्यापासून 3 लाख मतांनी मागे असताना पराभव स्वीकारला

- 12 ठिकाणी भाजपचा विजय, 290 ठिकाणी आघाडीवर, केंद्रीय मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक

- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पीएम मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिल्या शुभेच्छा

- वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 लाख 36 हजार 831 मताधिक्याने सर्वात पुढे

- भाजप मुख्यालयात पोहोचले पक्ष प्रमुख अमित शहा, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

- गांधीनगर येथून अमित शहा 5 लाख 11 हजार मताधिक्याने पुढे
- यूपीत कन्नौज येथून डिंपल यादव 14,943 मतांनी पिछाडीवर

- तिरुवनंतपुरम येथून काँग्रेस उमेदवार शशि थरूर 13 हजार मतांनी पुढे

- वाराणसीत मोदी 1,44,860 मतांनी, अमेठीत स्मृती इराणी 7 हजार मतांनी आघाडीवर

- महाराष्ट्रात युती 37 जागांवर, हरियाणात सर्व 10 ठिकाणी भाजप आघाडीवर

- अमित शाह गुजरातच्या गांधीनगर सीटवरून 1 लाख 25 हजार मतांनी पुढे

- पाटणा हुजूर साहिब येथून रवीशंकर प्रसाद आणि गुरुदासपूर येथून सनी देओल आघाडीवर

- रायबरेलीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आघाडीवर

- भोपाळमध्ये भाजपच्या प्रज्ञा सिंह ठाकूर 30 हजार मतांनी आघाडीवर

- अमेठीतून स्मृती इराणी 2000 मतांनी पुढे

- दिल्लीतील सर्व 7 जागांवर भाजप आघाडीवर, वाराणसीत आताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

- श्रीनगर येथून फारूक अब्दुल्ला आणि पंजाबच्या उधमपूर येथून केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद पुढे

- पाटणा हुजूर साहेबमध्ये काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पुढे, रवीशंकर प्रसाद पिछाडीवर

- संगरूर येथून आपचे उमेदवार भगवंत मान आघाडीवर

- तिरुवनंतपुरममध्ये माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर मागे

- बेगुसराय येथून भाजपचे गिरीराज सिंह यांची आघाडी

- रायबरेलीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी मागे, अमेठीत राहुल गांधी देखील पिछाडीवर

- दिल्लीतील 7 जागांपैकी 6 जागांवर भाजपची आघाडी, एका ठिकाणी काँग्रेस पुढे

- गुरुदासपूर येथून भाजप उमेदवार सनी देओल पिछाडीवर

- भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह 10 हजार मतांनी पिछाडीवर

- वाराणसीतून नरेंद्र मोदी 11 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

- एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हैदराबाद येथून पुढे

- राहुल गांधींचा गड अमेठीतून स्मृती इराणी यांची आघाडी

- वायनाड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर
- गांधीनगर येथून भाजप अध्यक्ष अमित शहांची 25 हजार मतांची आघाडी
- वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

बातम्या आणखी आहेत...