आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lok Sabha Elections : Veteran Actress Shabana Azmi Congratulate Pm Narendra Modi, Social Media User Trolled Her

लोकसभा निवडणूक : मोदींना शुभेच्छा दिल्या तर ट्रोल झाल्या शबाना आजमी, सोशल मीडिया यूजर्सने विचारले - 'पाकिस्तानला केव्हा जात आहात' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि एनडीएभक्कम बहुमत मिळाले आहे. गुरुवारी निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यांनतर शबाना आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, "भारताच्या जनतेने किती मजबूत जनादेश दिला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्ववाल्या एनडीएला खूप खूप शुभेच्छा." मात्र त्यांना या ट्वीटमुळे खूप ट्रोल केले जात आहे. लोक त्यांना विचारात आहेत की, 'पाकिस्तानला केव्हा जाणार आहे ?'

 

 

सोशल मीडिया यूजर्सच्या काही कमेंट्स... 
शबानाचे ट्वीट पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरु केलेल्या बसने पाकिस्तानला चालली जा" दुसऱ्या एका यूजरचे कमेंट आहे, "तुम्हाला शुभेच्छा देताना पाहून खूप छान वाटले. आपला मुलगा आणि पतींना सांगा की, पुढच्या 5 वर्षांपर्यन्त नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान आहेत." एका यूजरची कमेंट आहे, "रात्रीच्याही गाड्या आहेत खूप पाकिस्तानला जाण्यासाठी. कधी निघणार आहात ?" एका यूजरने लिहिले, "शुभेच्छा तर होत राहतील, तुम्ही सांगा जायचे केव्हा आहे ते ?"

 

का देत आहेत लोक पाकिस्तानला जाण्याचा सल्ला ?
झाले असे की, काही दिवसांपूर्वी शबाना आजमी यांच्याबद्दल अशी चर्चा होती की, त्यांनी त्या म्हणाल्या आहेत की, जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्या देश सोडून चालल्या जातील. मात्र स्वतः शबाना आजमी यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. आपल्या ट्वीटमध्ये सपाठीकरण देत त्यांनी लिहिले होते की, त्या भारतामध्ये जन्मल्या आहेत आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या येथेच राहतील.