आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Nomination News In Marathi, Nandan Nilkeni,Congress

बड्यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जांचा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात काँग्रेसचे नंदन निलेकणी आणि कमलनाथ, भाजपचे हर्षवर्धन आणि शत्रुघ्न व आपच्या गुल पनाग आणि शाजिया इल्मी यांचा समावेश आहे.


भाजप । नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मीनाक्षी लेखी आणि चांदनी चौकमधून डॉ. हर्षवर्धन यांनी अर्ज दाखल केले. पाटणासाहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांनी अर्ज भरला. त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष उडाला. चंदिगडमध्ये किरण खेर आणि गाझियाबादमधून व्ही. के. सिंह यांनी अर्ज दाखल केला.
काँग्रेस । नवी दिल्ली मतदारसंघातून अजय माकन आणि पूर्व दिल्लीतून संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल केला. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी म.प्र.मधील छिंदवाडामधून अर्ज भरले. बंगळुरू दक्षिणमधून नंदन निलेकणी यांनी अर्ज दाखल केला.
आप।चंदिगडमधून गुल पनागने अर्ज दाखल केला. दिल्लीच्या चांदनी चौकमधून आशुतोष, गाझियाबादमधून शाजिया इल्मी व गुडगावमधून योगेंद्र यादव यांनी अर्ज दाखल केला.


कोट्यवधी नेत्यांचा भरणा
संदीप दीक्षित यांच्या संपत्तीमध्ये 2009 च्या तुलनेत चार पटींनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती सुमारे दीड कोटी रुपये होती. मीरा कुमारने पाच वर्षांत सोने खरेदी नाही; परंतु संपत्ती साडेतीन पटीने वाढली.
मीरा कुमार (काँग्रेस, सासाराम)-36 कोटी
मनेका गांधी (भाजप, पिलीभीत)-45 कोटी
किरण खेर (भाजप, चंदिगड)- 12.34 कोटी.
संदीप दीक्षित (काँग्रेस, पूर्व दिल्ली)- 7.35 कोटी.
व्ही.के. सिंह (भाजप, गाझियाबाद)-4.12 कोटी
हर्षवर्धन (भाजप, चांदनी चौक)-12.37 कोटी.
आशुतोष (आप, चांदनी चौक)- 4.68 कोटी.


सभेच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना
निवडणूक आयोगाने प्रचार सभेच्या परवानगीची प्रक्रिया सुलभ केली आहे. लालफितीला कमी करून प्रत्येक मतदारसंघात एक खिडकी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या सभेसाठी एकाच छताखाली परवानगी देण्याचे काम पूर्ण केले जाईल. सिंगल विंडो परमिशन सेल तयार करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने बजावले आहेत. याच एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना इतरही परवानगी देण्यात याव्यात, असे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना वाहतूक पोलिसांकडे वेगळी परवानगी मागण्याची गरज भासणार नाही.