आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lok Sabha Speaker Om Birla Has Made More Than 6 Important Changes, So That In The Budget Session 6 Bills Passed

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी ६ पेक्षा जास्त महत्त्वाचे बदल केले, त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात २१ पैकी विक्रमी ९ विधेयके पारित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - १७ व्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या कारकीर्दीचा एक महिना पूर्ण झाला आहे.  या काळात त्यांनी सहापेक्षा जास्त महत्त्वाचे बदल केले. यात संसदेच्या कार्यवाही काळात एक तासाची शून्य प्रहराची परंपरा बंद करण्याशिवाय चर्चेअंती मंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर विरोधकांना संधी देणे यासारख्या नव्या परंपरेची सुरुवात करणे यांचा समा‌वेश आहे. परिणामी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मागील २० वर्षांच्या तुलनेत कामकाजाचा दर १२८ टक्के राहिला. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आतापर्यंत २१ विधेयके सादर करण्यात आली, त्यापैकी ९ पारित झाली आहेत. एनडीए सरकारच्या काळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हा विक्रम आहे. एवढेच नव्हे तर, ओम बिर्ला असे पहिले सभापती आहेत, जे आपले म्हणणे हिंदीतच मांडतात. त्यांनी संसदेत एखाद्या विधेयकावर मतदान होत असताना पाळली जाणारी परंपराही बदलून टाकली आहे. लोकसभेत सभापती आता इंग्रजीतील “आइस’ आणि “नोस’ याऐवजी हो किंवा नाही, असे शब्द वापरतात. एवढेच नव्हे, तर संसदेत ते माननीय सदस्य असा उल्लेख करतात. शून्य प्रहराबाबत त्यांनी बदल केला आहे. त्यांनी एक तासाची मर्यादा संपवली आहे. खासदारांना आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे मांडता यावेत म्हणून शून्य प्रहर असतो. यासाठी १० दिवसांच्या नोटिसीची गरज नसते. २९ जून रोजी शून्य प्रहरात ८४ सदस्यांनी म्हणणे मांडले. हा एक विक्रम ठरला. गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्प व त्यावरील चर्चा यामुळे शून्य प्रहर झालाच नव्हता. गुरुवारी सभापतींनी सायंकाळी ६ वाजता शून्य प्रहर निश्चित केला व विक्रमी १६२ सदस्यांना बोलण्याची  (४ तास ४८ मि.) संधी दिली.

 

सभागृहात बिर्ला नेहमी म्हणतात, ‘आसन पायावर आहे...’

“आसन पायावर आहे...’ याचा अर्थ असा की, सभापती खुर्चीतून उठून उभे आहेत आणि सर्व सदस्यांनी आपापल्या आसनावर स्थानापन्न व्हावे. सभागृहात अशी परंपरा आहे की, एखाद्या चर्चेदरम्यान एखादा खासदार म्हणणे मांडत असेल आणि सभापती उठून उभे राहिले तर त्या सदस्याला बोलणे थांबवून जागेवर बसावे लागते. 

बातम्या आणखी आहेत...