आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NATIONAL: दिल्ली 61%, केरळ 63%, हरियाणा 66%, बिहार 45% मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत 5 पर्यंत सरासरी 61 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये सर्वांधिक म्हणजे आतापर्यंत 63 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. केरळमधील आकडेवारी दुपारी 5 पर्यंतची आहे. यासह देशातील 91 मतदारसंघातही मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. हरियाणात 66 टक्के, जम्मूत 64 टक्के, झारखंडमध्ये 55 ते 60 टक्के तर बिहारमध्ये 45 टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांमध्ये आज (गुरुवार) सकाळी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरवात झाली. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जनतेने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, माजी पोलिस अधिकारी किरण बेदी, माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, भाजपचे माजी अध्यक्ष नितिन गडकरी, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल आदी मान्यवरांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
राखी बिडलान यांचे रांगेत न लागता मतदान
आम आदमी पक्षाच्या नेता राखी बिडलान मतदानासाठी मंगोलपूर परिसरातील मतदान केंद्रावर गेल्या होत्या. परंतु, मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. राखी यांनी रांगेत न लागता मतदानाचा हक्क बजावला. यावर काही नागरिकांनी आक्षेप नोंदविल्यावर चांगलाच गोंधळ उडाला. मात्र यावर स्पष्टीकरण देताना राखी म्हणाल्या, की मला काही नागरिकांनी रांगेत न लागता मतदान करण्याची विनंती केली होती. त्यामुळे मी थेट मतदान केले.
भारतातील प्रमुख राज्यांमध्ये दिवसभरात झालेले सरासरी मतदान
दिल्ली 61%
महाराष्ट्र 55%
हरियाणा 66%
बिहार 45%
जम्मू 64 टक्के
झारखंड 55 ते 60 टक्के
केरळ 63%
आज इलेक्ट्रॉनिक मतपेटीत यांचे भवितव्य होणार बंद
- चांदणी चौक मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, दिल्लीतील भाजपचे नेते हर्षवर्धन आणि माजी पत्रकात अशुतोष.
- चंदिगड मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री पवनकुमार बन्सल, अभिनेत्री गुल पनाग आणि किरण खेर.
- गाझियाबाद मतदारसंघातून माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह, अभिनेते राज बब्बर आणि आम आदमी पक्षाच्या शाजिया इल्मी.
- गुडगाव मतदारसंघातून योगेंद्र यादव, राव इंदरजितसिंह आणि धर्मपाल यादव निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
- तिरुअनंतपुरम येथून माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर, ओ. राजागोपाल आणि बेनेट अब्राहम निवडणूक लढवित आहेत.
LIVE BLOG
- हरियाणातील हिस्सार, शिरसा, कुरक्षेत्र परिसरात तब्बल 70 टक्के मतदान झाल्याची नोंद.
- कोचीमध्ये आम आदमी पार्टीची मते नोंदविण्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अपयशी.
- दिल्लीत यापूर्वी असे झाले मतदान- 1996-50.62%, 1998-51.29%, 1999-43.54%, 2004-47.09%, 2009-51.85%.
- दंगलग्रस्त मुजफ्फरनगरमध्ये 5 पर्यंत विक्रमी 66 टक्के मतदान.
- कॉंग्रेस केवळ आश्वासन देते आणि त्यानंतर विसरूनही जाते, मुरली मनोहर जोशी
- बिहारमध्ये 5 पर्यंत सरासरी 45 टक्के मतदान झाल्याचे समजते.
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण.
- हरियाणात 5 पर्यंत 61 टक्के मतदान झाल्याची माहिती.
- गाझियाबादमध्ये 5 पर्यंत 57 टक्के मतदान झाल्याची नोंद.
- गाझियाबाद येथील विजयनगर मतदान केंद्राच्या परिसरात गोळीबार. एक व्यक्ती जखमी. खासगी रुग्णालयात दाखल केले.
- हिसारमध्ये दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. काही काळ तणावाचे वातावरण.
- चंडिगडमध्ये दुपारी 3 पर्यंत केवळ 33 टक्के मतदान झाल्याची माहिती.
- हरियाणात दुपारी 4 पर्यंत 57.6 टक्के मतदान झाल्याची नोंदणी.
- मुजफ्फरनगरमध्ये दुपारी 3 पर्यंत 56 टक्के मतदान झाल्याची नोंद.
- जम्मूत दुपारी 3.30 पर्यंत 55 टक्के मतदान झाल्याची माहिती.
- भाजपला मतदान करण्याचे काही मतदारांना मिळाले एसएमएस. सीपीआय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविणार.
- गुडगावमध्ये दुपारी 3.30 पर्यंत तब्बल 50 टक्के मतदानाची नोंद.
- मध्य प्रदेशात दुपारी 4 पर्यंत 43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज.
- भोपाळ पोलिसांनी दोन कारमधून 14 लाख रुपये जप्त केले.
- ओडिशातील कोटपाड येथील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन माओवाद्यांनी पळवून नेल्या.
- ओळखपत्र न नेता गुलाम नबी आझाद मतदान केंद्रावर गेल्याने गोंधळ. मतदान अधिकाऱ्याने मतदानापासून रोखले. अखेर स्थानिक आमदाराच्या वैयक्तिक श्युअरीटीवर केले मतदान.
- पश्चिम उत्तर प्रदेशात दुपारी 1 पर्यंत जवळपास 25 टक्के मतदान.
- राहुल गांधी यांनी दिल्लीत केले मतदान.
- भागपत मतदारसंघात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांच्या गाडीवर दगडफेक.
- भाजप नेते वरुण गांधी यांनी दिल्लीत केले मतदान.
- मुजफ्फरनगरच्या पीडित कुटुंबीयांनी पोलिस संरक्षणात केले मतदान.
- जम्मूत सकाळी 11 पर्यंत 24 टक्के मतदान झाल्याचे समजते.
- गुडगावमध्ये दुपारी 12 पर्यंत 13 टक्के मतदान झाल्याची माहिती.
- हरियाणात दुपारी 12 पर्यंत तब्बल 30 टक्के मतदान झाल्याची नोंद.
- बस्तरमधील चार मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार. मतदान थांबविले.
- हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांनी केले मतदान.
- केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी म्हणाले, आम्हीच जिंकणार.
- केरळमध्ये सकाळी 9 पर्यंत जवळपास 16 टक्के मतदान.
- मुजफ्फरनगरमध्ये सकाळी 11 पर्यंत 27 टक्के मतदान झाल्याचे समजते.
- प्रियंका गांधी आणि रॉबर्ट बढेरा यांनी दिल्लीतील लोढी इस्टेट मतदान केंद्रात केले मतदान.
- उत्तर प्रदेशात सकाळी 11 पर्यंत साधारणपणे 26 टक्के मतदानाची नोंद.
- झारखंडमधील गुमला येथे इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या तीन जवानांची सहकाऱ्याकडून हत्या. बेछुट गोळीबार करीत केली हत्या.
- दिल्लीत 11 पर्यंत साधारणपणे 25 टक्के मतदान झाल्याचा अंदाज.
- बिहारमधील औरंगाबाद येथील मतदान केंद्राबाहेर तीन बॉम्ब सापडले. बॉम्ब नाशक पथक रवाना.
- बिहारमध्ये सकाळच्या सत्रात सर्वसाधारणपणे 17 टक्के मतदानाचा नोंद.
- भापच्या चंडिगड येथील उमेदवार किरण खेर यांनी वडील आणि लष्कराचे निवृत्त कर्नल 101 वर्षीय ठकारसिंग यांच्यासह केले मतदान.
- गाझियाबादचे कॉंग्रेस उमेदवार राज बब्बर म्हणाले, की आम्हाला कुठेच नरेंद्र मोदींचा प्रभाव दिसून येत नाहीये.
- मोठ्या प्रमाणावर मतदान करा, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे आवाहन.
- आपचे नेते मनिष शिसोदिया यांनी दिल्लीत केले मतदान.
- चंडिगडचे कॉंग्रेस उमेदवार पवन बन्सल यांनी मतदान केले.
- मध्ये प्रदेशातील छिंदवाडामध्ये सकाळच्या सत्रात 23 टक्के मतदान.
- माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मिरमधील उधमपूर येथे केले मतदान.
- ओडिशात लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाला सुरवात.
- दिल्लीत सकाळच्या सत्रात साधारणपणे 10 टक्के मतदान झाल्याचा अंदाज
- दिल्लीत सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत.
- केरळमधील 20 मतदारसंघांत पहिल्या सत्रात साधारणपणे 16 टक्के मतदानाचा नोंद.
- उत्तर प्रदेशातील दंगलग्रस्त मुजफ्फरनगरमध्ये किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान.
- दिल्लीत 70,47,885 पुरुष तर 56,57,648 महिला मतदार.
- बिहारमधील जमुई परिसरात लॅंडमाईन स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान शहीद.
मतदानाची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर...