आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसंग्रामचे उमेदवार लढणार अपक्षच; कपबशीची वेगळी खेळी, शिट्टी इतरांनाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- महापालिका निवडणुकीत मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले आहे. या वेळी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षासह अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षासह अपक्षांना निवडणूक अधिकारीनी चिन्हाचे वाटप केले आहे. या वेळी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेल्या उमदेवारांना 'शिट्टी' या चिन्हाची मागणी केली होती. मात्र, त्यांनी अर्ज भरताना एबी फॉर्म न दिल्याने त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले नाही. याकरिता आमदार अनिल गोटे यांनी स्वत: निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ व आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेतली.


पालिका निवडणुकीत आता उमदेवारी अर्ज छाननी हाेऊन अंतिम यादी करण्यात आली. तर मंगळवारी उमदेवारांना चिन्ह वाटप केलेे. उमदेवारांना िचन्ह वाटप निवडणूक कार्यालयातून झालेे. या वेळी चिन्हाचे वाटप करताना राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना राष्ट्रीय चिन्ह देण्यात आले आहे. तर अपक्ष उमेदवारांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राधान्यक्रमाने चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरताना अंतिम दिवशी त्या त्या पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत उमेदवारांची यादी देऊन एबी फॉर्म दिले होते. त्यामुळे त्या उमेदवारांना त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात अाले होते. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दिला होता. तर काहींनी पक्षाच्या नावाने 

 

लोकसंग्रामचे उमेदवार लढणार अपक्षच; कपबशीची वेगळी खेळी... 

अर्ज दिला होता. मात्र त्यांचा पक्षांचा एबी फॉर्म न मिळाल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणूनच राहिले. यात भाजपपासून वेगळी चूल मांडणारे आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या लोकसंग्रामच्या माध्यमातून उमेदवार देण्यात येतील अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देताना अर्जात चिन्हाच्या जागी शिट्टी चिन्ह लिहिले होते; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदतीआत लोकसंग्रामतर्फे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त न झाल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष करण्यात आली आहे. यामुळे चिन्ह वाटप करताना लोकसंग्रामच्या उमेदवारांना अपक्ष म्हणूनच इतरांसोबत विविध प्रकारचे चिन्ह वाटप करण्यात आले आहे. त्यात काही उमेदवारांना कोणत्या प्रभागात शिट्टी मिळणार आहे. मात्र अपक्षांना चिन्ह वाटप करताना एका प्रभागात एकच चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. याप्रमाणे १९ प्रभागात प्रत्येकी एक चिन्ह राहणार आहे. दरम्यान, िचन्ह वाटप करण्यात आल्याने आता प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. 

 

समाजवादी पार्टीच्या फातेमा अन्सारी बिनविराेध
राष्ट्रवादीच्या फौजिया अन्सारी यांनी याचिका घेतली मागे
प्रभाग क्रमांक १२ अ मधील अर्ज अवैध ठरल्याने उमेदवार फाैजिया बानाे याकूब यांनी दाखल केलेली याचिका तिन्ही पक्षांचे म्हणणे एेकून घेतल्यानंतर मंगळवारी मागे घेतली. त्यामुळे या प्रभागातील समाजवादी पार्टीच्या अन्सारी फातमा नुरूल अमीन बिनविराेध झाल्या.


महापालिका निवडणुकीत प्रभाग बारा अ मधून दाखल अर्जांची छाननी झाली. अन्सारी फाैजिया बानाे याकूब, पठाण जबैदा शेख नसीम शेख करीम यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विविध कारणांमुळे अवैध ठरविले हाेते. समाजवादी पार्टीच्या अन्सारी फातमा नुरूल अमीन यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविराेध निवड निश्चत मानली जात हाेती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध शेख नसीम शेख करीम यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यापैकी फाैजिया बानाे याची याचिका मंजूर करीत त्यांचा अर्ज कायम ठेवून स्वीकारला. त्यामुळे दाेन उमेदवारांमध्ये लढत हाेणार हाेती. याबाबत एकमेव अर्ज वैध ठरलेल्या फातमा नुरूल अमीन यांनी अॅड.नदीम अन्सारी यांच्या सल्ल्यानुसार सर्व कागदपत्रे, उमेदवारी अर्ज व अादेशाची नक्कल मिळवली. त्यानंतर न्यायालयात पिटीशन दाखल केले. त्यावर मंगळवारी सकाळी सुनावणी झाली.

 

त्यात अन्सारी फाैजिया बानाे यांनी त्यांच्या याचिकेत अन्सारी फाैजिया यांचे वय नियमानुसार नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरल्याचे दिसत असताना न्यायालयाची दिशाभूल केल्याचा मुद्दा न्यायालयाच्या लक्षात अाणून दिला. या वेळी मनपाचे वकील हजर नव्हते. अायुक्तांच्या खुलाशासाठी याप्रकरणी दुपारी सुनावणी ठेवली.
फेरसुनावणीत न्यायालयाने तीनही पक्षांचे म्हणणे एेकून घेतले. त्यानुसार अन्सारी फाैजिया बानाे यांची याचिका पुन्हा पटलावर घेण्यात अाली. त्या वेळी अन्सारी फाैजिया बानाे यांच्या वकिलांनी त्यांची कालची याचिका मागे घेतली. त्यामुळे याप्रकरणावर पडदा पडून समाजवादीच्या अन्सारी फातेमा नुरूल अमीन यांची बिनविराेधचा मार्ग माेकळा झाला, अशी माहिती अॅड.नदीन अन्सारी, अॅड.पवन पवार यांनी दिली.


कागदपत्रे दाखवली....
चिन्हा वाटपाच्या वेळी शहराचे आमदार अनिल गोटे हे जुन्या महापालिकेतील निवडणूक कार्यालयात येऊन त्यांनी निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना लोकसंग्रामतर्फे उभे केलेल्या उमेदवारांना शिट्टी हे एकच चिन्ह देण्यात यावे, असे सांगितले. त्या वेळी गणेश मिसाळ यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात अाल्याचे सांगत त्यांना त्याप्रमाणे कागदपत्रही दाखविण्यात आली. त्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांचीही भेट घेतली. मात्र, आता लाेकसंग्रामच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारी करीत प्रभागातून वेगवेगळ्या 
चिन्हावर  लढावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...