Home | Sports | Cricket | Off The Field | Lokesh rahul's half century in IPL

IPL : लोकेश राहुलचे शानदार अर्धशतक; किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा विजय

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 09:57 AM IST

अर्शदीपने टी-२० च्या पदार्पणातच ४३ धावांत घेतले २ बळी

  • Lokesh rahul's half century in IPL

    चंदिगड- लोकेश राहुलच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्स संघावर १२ धावांनी मंगळवारी आयपीएलच्या १२ व्या सत्रात विजय मिळवला. अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (१७ धावा, २ बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.


    नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ६ बाद १८२ धावा उभारल्या. यात लोकेश राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४७ चेंडंूत ३ चौकार व २ षटकार खेचत सर्वाधिक ५२ धावा ठोकल्या. त्याला जयदेव उनाडकटने आर्चरच्या हाती झेलबाद केले. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार लगावत ३० धावा केल्या. आर्चरने सॅमसनच्या हाती झेलबाद करून अडथळा दूर केला. मधल्या फळीतील मयंक अग्रवालने १२ चेंडूंत फटकेबाजी करत १ चौकार व २ षटकार खेचत २६ धावा चोपल्या. डेव्हिड मिलरने २७ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा जोडल्या. आर. अश्विन १७ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानच्या जे. आर्चरने भेदक गोलंदाजी करत १५ धावा देत ३ फलंदाज बाद केले. धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


    राहुल त्रिपाठीचे अर्धशतक ठरले व्यर्थ
    प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स निर्धारित २० षटकांत ७ बाद १६८ धावा काढू शकला. यात सलामीवीर राहुल त्रिपाठीने ४५ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. जोस बटलरने १७ चेंडूंत २३ आणि संजू सॅमसनने २१ चेंडूत २७ धावा चोपल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने २१ चेंडूत २६ धावा काढल्या. स्टुअर्ट बिन्नीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्याने ११ चेंडंूत ३१ धावा ठोकल्या. पंजाबच्या अर्शदीपने टी-२० च्या पदार्पणातच ४३ धावांत २ बळी घेतले. शमी व अश्विनने प्रत्येकी २ गडी बाद केले.

Trending