Home | Maharashtra | Mumbai | Loklsabha election Voting completed in Maharashtra

राज्यातील 10 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक तर सोलापूरमध्ये सर्वात कमी मतदान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 18, 2019, 07:46 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या तक्रारी

 • Loklsabha election Voting completed in Maharashtra


  मुंबई दि 18 - आज राज्यभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. देशातील 13 राज्यांत 97 जागांवर हे मतदान मतदान पार पडले. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या तक्रारी समोर आल्या. पण या सर्व अडचणींना पार करत मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी सोशल मीडियाचे गालबोटही लागले.

  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

  राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी :

  > बुलडाणा - 57 .8 टक्के,

  > अकोला - 54.45 टक्के,

  > अमरावती 55.43 टक्के,

  > हिंगोली - 60.69 टक्के,

  > नांदेड - 60.88 टक्के,

  > परभणी - 58.50 टक्के,

  > बीड - 58.44 टक्के,

  > उस्मानाबाद - 57.04 टक्के,

  > लातूर 57.94 टक्के,

  > सोलापूर - 51.98 टक्के

  एकूण - 57.22 टक्के

  पुढील स्लाईडवर पाहा..... मतदानाचा हक्क बजावताना मतदार

  अपडेट्स.....

  > वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात मतदान केले. कृषीनगर भागातील पोदार इंटरनॅशनल शाळेतील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

  > मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी परभणीत तिघांवर गुन्हा

  > आळगे (ता. अक्कलकोट) येथे दुपारी तीन वाजेपर्यत 1557 पैकी फक्त 75 जणांनी मतदान केले. भीमा नदीत पाणी सोडावे तसेच रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार.

  > उमरखेडचे आमदार राजेंद्र नाजरधाने यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

  > सोलापूर - उजनी धरणातून पाणी सोडले नाही, यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुडल, अंकलगी आणि आळगी या तीन गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. आंदोलन करून बहिष्कार टाकण्याचा दिला होता इशारा.

  > भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी बजावले मतदानाचे कर्तव्य.

  > उस्मानाबादेत मतदानावेळी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

  > अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रविण पोटे पाटील यांनी आपल्या परीवारासकट सकाळीच मतदानाचे कर्तव्य बजावले.

  > अगोदर मतदान नंतर बोहल्यावर चढणार
  जालना- रामसगावतील आकाश भोजने या तरुणाने स्वतःचे लग्न असून देखील लोकशाही बळकट करण्यासाठी अगोदर मतदानाला महत्व दिले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

  > विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  > मतदान झाले जाहीर, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

  बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन मध्ये अचानक बिघाड झाला मशीन दुरुस्त करताना कर्मचाऱ्याकडून चुकीचे बटन दाबले गेले आणि झालेले मतदान फुटले. तेथे राष्ट्रवादीला 22 शिवसेनेला 8 वंचित बहुजन आघाडी ला 2 आणि अपक्षाला एक मत पडल्याचे समोर आले
  मतदान सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे

  > उस्मानाबाद जिल्ह्यात 3 गावात मतदानावर बहिष्कार

  > महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांनी केले मतदान

  > अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील योगेश नागळे हा युवक मतदान केल्यानंतरच बोहल्यावर चढण्यासाठी मार्गस्थ झाला

  > हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खा. राजीव सातव यांनी आपले संपत्नीक मतदान मसोड ता. कळमनुरी येथे मतदानाचा हक्क बजावला

  >माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

 • Loklsabha election Voting completed in Maharashtra
 • Loklsabha election Voting completed in Maharashtra
  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • Loklsabha election Voting completed in Maharashtra

  हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खा. राजीव सातव यांनी आपले संपत्नीक मतदान मसोड ता. कळमनुरी येथे मतदानाचा हक्क बजावला.

 • Loklsabha election Voting completed in Maharashtra

  अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील योगेश नागळे हा युवक मतदान केल्यानंतरच  बोहल्यावर चढण्यासाठी मार्गस्थ झाला.

 • Loklsabha election Voting completed in Maharashtra

  महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांनी केले मतदान

Trending