आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमंगलच्या शुभमंगल सोहळ्यात 107 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सूर्य मावळतीला चाललेला...गोरज मुहूर्तावर लगीनघाई सुरू झालेली...वऱ्हाडी मंडळींची एकच लगबग... तो मंगलमय क्षण अाला... हजारो लोकांच्या साक्षीने १०७ जोडप्यांनी रेशीमगाठी बांधल्या... निमित्त होते लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे... 

रविवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात हा सोहळा रंगला. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने त्याचे आयोजन केले होते. हजारोंच्या हातांनी मंगल अक्षदा टाकण्यात आल्या. त्यानंतर उभयतांच्या धर्म, प्रथेप्रमाणे पूजा व होमहवन करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी सर्व वधू- वरांचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी समुपदेशन केले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सपारी व रुखवत साहित्य देण्यात आले. विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिर व स्तनपानगृहही उभारण्यात आले होते. 

 

यंदाच्या उपक्रमाचे १३ वे वर्ष अाहे. त्यासाठी ७ हजार स्वयंसेवक कार्यरत होते. वऱ्हाडी मंडळीच्या पंगत बसविण्यात अगोदर अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी निराधार आजी- आजोबांना औक्षण करून पहिल्या पंगतीचा मान देण्यात आला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींच्या पंगतीला सुरुवात झाली. वधू-वरांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सात रस्ता, होटगी रोड, अासरा चौक, डी-मार्ट, भारती विद्यापीठ, विजापूर रोड, कंबर तलावमार्गे हरिभाई देवकरण प्रशालेपर्यंत काढण्यात आली. या मंगलमय सोहळ्यासाठी श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरू डॉ. चन्नसिद्ध पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, जयसिद्ध महास्वामी, सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज चव्हाण, बसवशास्त्री महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, महापौर शोभा बनशेट्टी, प्रा. अशोक निंबर्गी, राज्यसभा सदस्य अमर साबळे, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, इंद्रजित पवार, मनीष देशमुख आदींसह नागरिक व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद दिले. 

 

सुयोग्य नियोजन, गडबड नाहीच 
या सोहळ्यात प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे यासह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बाळकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले. साहित्य वाटप व जेवणाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. कुठेच गडबड गोंधळ झाला नाही. 

 

Ãलक्ष्मण महाराजांच्या सांगण्यावरून १६ हजाराहून अधिक जोडपी विवाहबध्द करण्याचा संकल्प करीत आहे. त्याचे नक्कीच पालन करेन. ३१ डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. पुढील वर्षी कारखान्यावरही सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचे नियोजन आहे. या सोहळ्यांमुळे सामाजिक, अार्थिक परिवर्तन होते. 

- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

 

कोण काय म्हणाले 
Áखा. अमर साबळे- सामुदायिक विवाह सोहळ्यातून सामाजिक परिवर्तनाची नांदी दिसून येते. हा सोहळा सुरू केल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. 
Á शिवाचार्य महास्वामी- सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह होणारे भाग्यवान असून विविध मान्यवर व महास्वामींच्या उपस्थितीत सोहळा झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...