आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मीडियाची निवडणुकीवर नजर: मोदी, केजरीवालांचीच चर्चा, राहुल बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय माध्यमे नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रत्येक लहानसहान हालचालीच्या बातम्या देत आहेत, पण जागतिक मीडियामध्ये छाप आहे ती मोदी आणि केजरीवाल यांचीच. जागतिक मीडियाही निवडणुकीतील मोठ्या घटना, उमेदवार आणि पक्षांबाबत बातम्या, विश्लेषणे देत आहे. त्याचाच काही सारांश....

न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका)
मोदी प्रबळ दावेदार, आपचे आव्हान


मंदिरांच्या शहरात भाजपचे उमेदवार
भाजप उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून सरकार बनवण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ते वाराणसी या मंदिरांच्या शहरांतून निवडणूक लढवत आहेत. संपूर्ण देशात त्यांचीच लाट जाणवत आहे.

केजरीवालांचा पक्ष मोठा बनेल
यांचा पक्ष किमान काँग्रेसच्या जागांचे नुकसान तरी करेल. हा मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. यांना ज्या प्रकारचे राजकारण हवे आहे, त्यासाठी यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने त्यांची बातमी दोन भागांत दिली आहे. त्यापैकी एकात सत्तेसाठी महत्त्वाच्या राज्यांबाबत माहिती दिली आहे.
सत्ता कोणाची हे 5 राज्ये ठरवणार उत्तर प्रदेश(80 जागा), पश्चिम बंगाल (42 जागा), महाराष्ट्र (48 जागा), तामिळनाडू (39 जागा), बिहार (40 जागा)

द फायनान्शियल एक्स्प्रेस (बांगलादेश)
काँग्रेसला एका कोपर्‍यात ढकलले

वृत्तपत्राने निवडणुकांच्या एकूण परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. काँग्रेसला या वेळी कशा प्रकारे अडचणी येऊ शकतात, हे त्यात नमूद करण्यात आले आहे.

राहुलची जादू चालणार नाही
० राहुल यांचा पक्ष प्रतिष्ठा वाचवण्यासाठी झगडत आहे, पण तरीही त्यांना यश मिळत नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
० काँग्रेसचे माजी खासदार एम.जे.अकबर यांनी पक्ष सोडल्यानेही नाचक्की झाली आहे.
० काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याने जनतेत चुकीचा संदेश जात आहे.

मोदी देशाचे नवे नेते
मोदी देशाचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात. फक्त नशिबाने काही खेळी करता कामा नये.

नवा चेहरा केजरीवाल
दिल्लीमध्ये आश्चर्यकारक विजय मिळवल्यानंतर केजरीवाल राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा बांगलादेश, चीन आणि गल्फ देशातील मिडीयाने मांडलेले मत..