आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election 2014 Bihar Muslim Voter Latest News In Marathi

बिहारमध्ये मुस्लिम किंगमेकर, एकूण मतदारांपैकी 16.5 टक्के अल्पसंख्यांक मतदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये मुस्लिम मतदार नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात. राज्यातील एकूण मतदारांपैकी 16.5 टक्के मुुस्लिम आहेत. काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिमांनी भागलपूर दंग्यांनंतर बिहारमध्ये काँग्रेसची साथ सोडली आहे. 1989 नंतर 15 वर्षे ते लालूंसोबत होते. मात्र 2005 मध्ये त्यांची मते विभागली तेव्हा लालूंच्या हातून सत्ता गेली.
या निवडणुकीत लालू पुन्हा एकदा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 27 पैकी सहा जागांवर मुस्लिम उमेदवार उतरवले आहेत. यूपीए आघाडीकडून एकूण आठ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसची साथ आणि जदयू-भाजपची ताटातूट झाल्याचा फायदा लालूंना होऊ शकतो.
जो पक्ष भाजपला रोखण्यात यशस्वी होताना दिसेल, त्यांनाच सामान्य मुस्लिमांचे मत जाते. त्यामुळे यंदाही नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी येथील मतदार हीच युक्ती वापरतील.
17 जागांवर 15 % मुस्लिम मतदार
बिहारमधील 40 पैकी 17 जागांवर मुस्लिम मतदार 15 टक्क्यांहून अधिक आहेत. त्यापैकी किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया येथे मुस्लिम मतदारांचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे. मात्र मागील निवडणुकीत फक्त तीन मुस्लिम निवडणुकीत यशस्वी झाले होते. 17 जागांपैकी किशनगंज आणि भागलपूरमध्ये मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते. अररिया, कटिहार, पूर्णिया, पश्चिम चंपारण्य, पूर्वी चंपारण्य, शिवहर, मधुबनी, दरभंगा आणि भागलपूरमध्ये भाजप जिंकला होता. किशनगंजच्या जागेवर काँग्रेस आणि सिवानमध्ये अपक्ष उमेदवार जिंकले होते.
निवडणुकांनंतर परिणाम दिसेल
फुलवारी शरीफचे अमीर ए शरियत हजरत मौलाना सय्यद निजामुद्दीन यांच्या मते, बिहारमधील राजकीय नूर देशातील इतर भागांसारखाच आहे. शाही इमामांच्या आवाहनाचे काय आणि किती परिणाम होतील, हे सांगणे कठीण आहे. कारण प्रत्येक निवडणुकीपूर्वी ते असे आवाहन करतच असतात.
फक्त 15 उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत उतरलेल्या पक्षांनी बिहारमध्ये फक्त 15 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यात सर्वाधिक सहा उमेदवार राजदने उतरवले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर जदयू असून त्यांचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजप, लोजप आणि एनसीपीने एक-एक उमेदवाराला तिकीट दिले आहे.