Home | Maharashtra | Mumbai | loksabha election 2019 maharashtra political party issue

राज्यात लाेकसभेच्या निकालावर ठरणार विधानसभेचे भवितव्य, युती-आघाडीच्या लढतीचे ‘महाभारत’

दिव्य मराठी | Update - Mar 11, 2019, 09:06 AM IST

शेतकरी कर्जमाफी, राेख मदत, नाेकरभरती, वेतन आयोग, मराठा आरक्षण, आर्थिक निकषावर आरक्षण, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती.

 • loksabha election 2019 maharashtra political party issue

  भाजप : विकासाचा पाढा
  जमेची बाजू :
  शेतकरी कर्जमाफी, राेख मदत, नाेकरभरती, वेतन आयोग, मराठा आरक्षण, आर्थिक निकषावर आरक्षण, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती.
  बलस्थाने : माेदी, फडणवीसांची प्रतिमा, भ्रष्टाचाराचे आराेप नाहीत, तळागाळत नेटवर्क, माेठी प्रचारयंत्रणा, संघाचे व्यापक जाळे.
  उणिवा : धनगर- मराठा आरक्षण रखडलेलेच, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, कृषीमालाचे दर घसरले, जातीय तणाव, अॅन्टी इंनकम्बन्सी.
  व्हाेट बॅंक : उच्चवर्णीय, शहरी नवमतदार, छाेटे व्यापारी, परप्रांतीय.


  सेना : हिंदुत्वाचा नारा
  जमेची बाजू :
  दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांना मदत, नाणार प्रकल्प रद्द करवून घेतला, दुष्काळी मदत तातडीने करण्यास सरकारला भाग पाडले.
  बलस्थाने : शहरी व ग्रामीण भागात स्ट्राँग नेटवर्क, आक्रमकतेने प्रश्न साेडवून घेण्याची पद्धत, मदतीस तत्पर, राम मंदिरासाठी आग्रही.
  उणिवा : सत्तेत राहूनही ठाेस कामे करण्यात अपयशी. वारंवार बदललेली भूमिका, ज्यांच्यावर टीका त्यांच्याशीच एेनवेळी हातमिळवणी.
  व्हाेट बॅंक : मराठवाडा, काेकण, मुंबईतील मराठी माणूस, हिंदुत्ववादी.


  काँग्रेस : आघाडीची माेट
  जमेची बाजू
  : राष्ट्रवादीशी आघाडी, जनसंघर्ष यात्रेद्वारे भाजप, माेदीविरुद्ध वातावरण निर्मिती, राजू शेट्टीसह छाेट्या पक्षांची साथ, सरकारच्या फसलेल्या याेजना.
  बलस्थाने : राहुल गांधींचे नेतृत्व, तीन राज्यांत विजयाने आत्मविश्वास, ग्रामीण केडर पुन्हा सक्रिय केले.
  उणिवा : अंतर्गत मतभेद राेखण्यात अपयश. राज्यात एकखांबी नेतृत्वाचा अभाव, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत आणण्यात अपयशी.
  व्हाेट बॅंक : दलित- मुस्लिम, नाराज आेबीसी, धनगर, परप्रांतीय व पारंपारिक मते.सविस्तर. पान ४


  राष्ट्रवादी : पंखात बळ
  जमेची बाजू : स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार रिंगणात. परिवर्तन यात्रेतून भाजपविराेधी एल्गार. भुजबळ, मुंडेंसारखे आक्रमक वक्ते, मंत्र्यांवर आराेपांच्या फैरी, पश्चिम महाराष्ट्रात नेटवर्क.
  बलस्थाने : साखर कारखाने, सहकारी- शिक्षण संस्थांचे जाळे, मराठा- बहुजनांचा पक्ष ही प्रतिमा.
  उणिवा : मराठा समाज दुरावला, घाेटाळेबाज पक्ष ही प्रतिमा कायम राहिल्याने सुशिक्षित लाेक दुरावले.
  व्हाेट बॅंक : ग्रामीण मतदार, कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँकांचे खातेदार, कर्जदार.

Trending