आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या निवडणुकीत युवक, शेतकरी केंद्रस्थानी; कर्जमाफी, बेरोजगारांना भत्त्याची प्रलाेभने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत  राजकीय पक्षांनी युवक व शेतकऱ्यांकडे लक्ष दिले आहे. १२ राजकीय पक्ष युवक व  शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी काही पक्षांनी बेराेजगार भत्ता तर काही किमान वेतन मू्ल्य देण्याचा दावा करत आहेत. शेतकऱ्यांसाठी तर तिजाेरीच उघडून दिली आहे.  एनडीएने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची याेजना सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पडला आहे.  यूपीएमधील प्रमुख पक्ष काँग्रेसने कर्जमाफी देण्याची घाेषणा केली आहे. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसने कर्जमाफी जाहीर केली.


89.60काेटी
निवडणूक आयाेगानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 89.60 काेटींपेक्षा जास्त मतदार असणार आहेत. त्यात जवळपास 46.47 काेटी पुरुष तर 43.13 काेटी महिला आहेत. तसेच 39,683 थर्ड जेंडर्स मतदानाचा अधिकार बजावतील.


8.3 काेटी 
नवीन मतदार या लाेकसभा निवडणुकीत असतील. त्यात 1.5 काेटी 18-19 वर्षांचे आहेत. 1.5 लाख नवे मतदार प्रत्येक जागेवर असतील.  

युवक : 33 काेटी 25 पेक्षा कमी वयाच्या18 काेटी युवती
देशात या वर्षी 89.60 काेटी मतदार आहेत. त्यात १८ ते ३५ वयाच्या युवक मतदारांची संख्या 33 काेटी आहे. जे एकूण मतदारांच्या 37 टक्के आहे. त्यात 18 काेटी युवती आहेत. त्याचे वय 25 पेक्षा कमी आहे. निवडणूक रणनीतिकार म्हणतात, नवीन मतदार २ ते ३ टक्केच असू शकतात. 

महिला : 43 काेटी नवीन मतदारांत सर्वात माेठी संख्या
लोकसभा जागांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जवळपास अर्धी किंवा त्यापेक्षा कमी आहे. नवीन मतदारांत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचा अंदाज आहे. 2015 ते 2018 पर्यंत दोन काेटी 85 लाख 55 हजार पुरुष व 3.24 काेटी महिला नवीन मतदार झाल्या. यामुळे त्यांना आकर्षित केले जात आहे. 


शेतकरी : 11.87 काेटी खात्यांत वर्षाला 6 हजार रुपये देणे सुरू
देशात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 11 काेटी आहे. एका अहवालानुसार, देशातील एकूण कामगारांत अर्धे कृषी क्षेत्रात आहे. देशाच्या जीडीपीत त्यांचे योगदान 17-18 टक्के आहे. 2011 च्या लाेकसंख्येनुसार कृषी क्षेत्राशी संबंधित लाेकांची संख्या 26.30 काेटींपेक्षा जास्त आहे. त्यात शेतकऱ्यांबराेबर शेतमजूरही आहेत. 

बातम्या आणखी आहेत...