आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा निवडणुकीत विजयासाठी सर्वच उमेदवार आपापली गणिते जुळवत आहेत. त्यात ते कितपत यशस्वी होतील, हे निकालानंतरच कळणार आहे; परंतु विद्यमान परिस्थितीत निकालाच्या दिशेने संकेत देणारी लक्षणे दिसत आहेत. काही जण स्वकीयांमुळे अडचणीत आहेत, तर काही जण आपल्या निर्णयामुळे गोंधळून गेले आहेत. काही जण खूपच पुढे निघून गेले आहेत, तर काही जणांची प्रचंड पीछेहाट होऊ लागली आहे.. आणि काही जणांचे तर विरोधकच भले करू लागले आहेत..
जे पुढे निघून गेले..
व्ही.के. सिंह, गाझियाबाद (भाजप)
सबंध निवडणूक युद्धाप्रमाणे लढली. वॉररूम तयार केले. प्रचारासाठी ब्रिगेडमध्ये 120 सेवानिवृत्त अधिकारी जुंपले. आधी राज बब्बरांचे आव्हान मानले जात होते. पण त्यांच्या प्रचारात रंगतच आली नाही. आपच्या शाजिया इल्मींची स्थिती तर त्याहून वाईट राहिली.
सचिन पायलट, अजमेर (काँग्रेस)
विधानसभेला या भागातील एकही निवडणूक जिंकू शकले नाहीत. माजी आमदार बाबूलाल सिंघारिया आणि जिल्हाध्यक्ष रामचंद्र चौधरी भाजपमध्ये गेले. प्रदेशाध्यक्ष असूनही आपल्याच मतदारसंघात व्यस्त. मतदारसंघ बदलण्याच्या चर्चेमुळे मतदारांवरील पकड सैल झाली. पण परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे.
अजित जोगी, महासमुंद (काँग्रेस)
याच मतदारसंघातून दुसर्यांदा निवडणूक रिंगणात. प्रचारातूनच माहौल तयार करण्यात यशस्वी राहिले. मोठे नेते आणि सर्मथकांना प्रचारासाठी तैनात केले. एनएसयूआय आणि युवक काँग्रेसची टीमही ठाण मांडून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.