आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 8.73 काेटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 17व्या लोकसभेसाठी निवडणुकीची घाेषणा हाेताच देशाबराेबरच महाराष्ट्रातही आचारसंहिता लागू झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.


राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाेकप्रतिनिधींना स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करता येणार नाही. 


काटाेल पाेटनिवडणूक
नागपूर जिल्ह्यातील काटाेल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल राेजी पाेटनिवडणूक हाेणार आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य हाेत नसल्याच्या निषेधार्थ व पक्षातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून आमदारकीचा राजीनामा दिला हाेता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली हाेती. या निवडणुकीची मतमाेजणीही २३ मे राेजी हाेईल. 


निवडणुकीसाठी कर्मचारी 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी महाराष्ट्रात सुमारे सहा लाख कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.  तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहे.


मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरवरील अपंगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. सुविधा पुरवण्यात येणार आहेत. मतदानासाठी लागणारी साधनसामुग्री व मतदान केंद्रावर साेयी पुरविण्याची कार्यवाहीही पूर्ण करण्यात आली आहे.


मतदार नोंदणी सुरूच 
मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. अद्यापपर्यंत मतदार नोंदणी न झालेल्या पात्र नागरिकांना त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस अगोदरपर्यंत नोंदणी करता येईल.

बातम्या आणखी आहेत...