आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Loksabha 2019 ; वाराणसीत मोदींचा पुन्हा एकदा मोठा विजय, 3 लाख 85 हजार मतांनी मारली बाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाची धुरा सांभाळणार असल्याचे दिसत आहे. देशातील चर्चित मतदार संघांपैंकी एक असलेल्या वाराणसी मतदार संघात पंतप्रधान मोदींन दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी मोदींनी तब्बल 3 लाख 85 हजार मतांनी विजय प्राप्त केला आहे. 


वाराणसीत 56.97 टक्के झाले होते मतदान 
या मतदारसंघात काँग्रेसकडून अजय राय तर समाजवादी पार्टीकडून शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण मोदींसमोर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वाराणसीमध्ये यावेळी 56.97 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 

 

2014 मध्ये 5 लाखांहून अधिक मतांनी मिळवला होता विजय 
2014 मध्ये याच मतदारसंघात 58.35 टक्के मतदान झाले होते. 2014 मध्ये मोदींना या मतदारसंघातून 5 लाख 81 हजार मते मिळाली होती. मोदींनी 2014 मध्ये अरविंद केजरीवाल यांचा पावणे चार लाख मतांनी पराभव केला होता. तर अजय राय हे तिसऱ्या क्रमांकावर होते.