आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB Fraud: लंडनच्या कोर्टाने फेटाळला नीरव मोदीचा जामीन अर्ज, तिसऱ्यांदा दाखल केला होता अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी (48) ने बुधवारी लंडनच्या वेस्टमिन्सटर कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नीरव मोदीने केलेला जामीन अर्ज फेटाळला जाण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दोनदा नीरव मोदीची याचिका फेटाळण्यात आली होती. नीरव साउथ-वेस्ट लंडनच्या वड्सवर्थ जेलमध्ये आहे. त्याला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. नीरवला कोर्टासमोर 30 मे रोजीच्या सुनावणीत हजर केले जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 26 एप्रिल रोजी व्हीडिओलिंकच्या माध्यमातून नीरव प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्या दिवशी नीरव मोदीने जामीन अर्ज दाखल केला नव्हता.


नीरवच्या प्रत्यर्पणासाठी भारताची बाजू मांडणारे क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, नीरव नवीन पुराव्यांच्या आधारे परिस्थितींमध्ये बदल करण्याची विनंती करत आहे. त्याला न्यायाधीशांकडे हे पटवून द्यावे लागेल, तेव्हाच त्याला जामीन अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळू शकेल. 29 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत नीरवच्या वकिलांनी 10 लाख पाउंडच्या जामीन आणि इलेक्ट्रॉनिक टॅगच्या माध्यमातून नीरवच्या हालचालींवर नजर ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, जज एमा अर्बथनॉट यांनी सांगितले होते, की हे मोठ्या घोटाळ्याचे प्रकरणा आहे, ज्यामध्ये भारतीय बँकेला नुकसान झाले आहे. सशर्त जामीनाने भारत सरकारच्या चिंता समाप्त होतील यावर मी समाधानी नाही असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.


नीरवने साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला याची आठवणही न्यायाधीशांनी करून दिली. घोटाळ्याचे हे प्रकरण सामान्य नाही. ब्रिटनमध्ये नीरवचा सामाजिक वलय नाही. त्याने 2017 मध्ये वनुआतुचे नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तो ऐनवेळी भारत सोडणार होता, हे यावरून स्पष्ट होत आहे. 29 मार्च रोजी दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 26 एप्रिल रोजी नीरव मोदीची व्हीडिओलिंकच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. त्या दिवशी नीरवने जामीन अर्ज दाखल केला नव्हता. त्याचा पहिला जामीन अर्ज 19 मार्च रोजी फेटाळण्यात आला होता. अटकेनंतर त्याला त्याच दिवशी कोर्टात हजर करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...