आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच जागी बसून उशिरापर्यंत काम करत असाल तर होऊ शकता लठ्ठ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच जागेवर बसून उशिरापर्यंत काम केल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. याशिवाय इतर कित्येक आजार होण्याची शक्यता असते. ऑफिस किंवा घरात उशिरापर्यंत बसून काम करत असाल तर सवय बदला.
१. शरीर दुखणे
एकाच स्थितीत बसून तासन‌्तास काम केल्यामुळे मांसपेशी कठोर होतात. यामुळे मान आिण पायांमध्ये वेदना होऊ शकतात. म्हणून मध्ये मध्ये उठून अवश्य चालावे. कित्येकदा पाठ किंवा कंबरदुखीचे कारण उशिरापर्यंत बसून काम करणे असते.

२. लठ्ठपणा
उशिरापर्यंत एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. पोटाची चरबी वाढू लागते. याशिवाय शरीरात रक्त प्रवाह पूर्णपणे होत नसल्यामुळे रक्ताच्या गाठी होतात आिण स्ट्रोकची शक्यता वाढते.

३. हृदयरोग
जर तुम्हीदेखील जास्तवेळ बसून राहत असाल तर तुम्हाला हृदयासंबंधी समस्यांचा धोका होऊ शकतो. सतत बसल्यामुळे पल्मोनरी एम्बोलिज्म म्हणजे फुप्फुसात रक्ताच्या गाठी होऊ लागतात. हृदयासंबंधी समस्या आिण मधुमेहाचा धोका वाढतो.

याकडे द्या लक्ष
- थोड्या थोड्या वेळाने उठून आजूबाजूला फिरा.
- काही काम उभे राहून करा.
- शरीराच्या आकाराकडे नेहमी लक्ष द्या.
- कामादरम्यान खांदे आिण मानेला फिरवा
- पौष्टिक आहार घेणेही आवश्यक आहे.
- पायांना थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा.

बातम्या आणखी आहेत...