आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- तुम्हाला मित्र किंवा कुटुंबासोबत फिरण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या वर्षात तुम्हाला फिरण्यासाठी फक्त 10 दिवसांचा वीकेंड्स मिळेल. हा लाँग वीकेंड्सपण कंपन्यांच्या लीव पॉलिसीवर आधारीत असेल. नवीन वर्षात तुमच्याकडे कमी सुट्ट्या असतील. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये तुम्हाला फिरण्यासाठी जास्ती संधी मिळणार नाहीत.
जानेवारी
नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात 12, 13 आणि 14 जानेवारी तुम्हाला सुट्ट्या मिळतील. 12 जानेवारीला शनिवार, 13 जानेवारीला लोहड़ी (रविवार) आणि 14 जानेवारीला मकर संक्रांति आहे.
फेब्रुवारी
या महिन्यात शनिवार आणि रविवार शिवाय 5 फ्रेब्रुवारीला लोसार (डोंगराळा भागात साजरी केला जाणारा दिवस) आहे. याची सुट्टी फक्त डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी असते.
मार्च
मार्चच्या पहिल्या आठवड्यात शनिवार आणि रविवार आहे, त्यानंतर 4 ला महाशिवरात्रि आहे. या तीन दिवस तुम्हाला सुट्ट्या मिळतील. त्यानंतर 21 मार्चला होळी आहे पण तुम्ही 22 तारखेला शुक्रवारी सुट्टी घेऊन 23 आणि 24 मार्चला वीकेंड एन्जॉय करू शकता.
एप्रिल
19 एप्रिल गुड फ्राइडे (Good Friday)आणि 20 पासून वीकेंड.
मे
या पुर्ण महिन्यात शनिवार आणि रविवार सोडून सुट्टी नाहीये.
जून
जूनची सुरुवात वीकेंड्सने होईल. तर, 5 जूनला ईद (Eid al-Fitr, Meethi Eid) आहे.
जुलै
या महिन्यात कोणतीच सुट्टी नाहीये.
ऑगस्ट
10 ऑगस्त (शनिवार), 11 ऑगस्त (रविवार) आणि 12 ऑगस्तला बकरीद (Bakrid, Eid al-Adha) आहे. त्यानंतर 15 ऑग्सटला रविवार आणि स्वतंत्र्य दिवस आहे(Independence Day) आणि राखी (Raksha Bandhan) आहे.
सप्टेंबर
या महिन्यात फक्त गणश चतुर्थीची सुट्टी आहे.
ऑक्टेबर
गांधी जयंती (Gandhi Jayanti), दिवाळी (Diwali), भाउबीज (Bhaiya Dooj), गोवर्धन पूजा (Govardhan Puja) आणि दसरा (Dussehra) याच महिन्यात येतात. 2019 मध्ये 5, 6 च्या वीकेंड नंतर 7 ऑक्टेबरला राम नवमी आणि 8 ऑक्टोबरला दसरा, त्यानंतर 27 अक्टूबरला दिवाळी, गोवर्धन पूजा 28 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज आहे.
नोव्हेंबर
12 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे.
डिसेंबर
25 डिसेंबरआधी 21 आणि 22ला वीकेंड आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.