आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांच्या वयात या मुलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड, 10 वर्षांपूर्वी घेतला होता निर्णय...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- गुजरातमध्ये राहणाऱ्या एका मुलीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नाव नोंदवले आहे. नीलांशी नावाच्या 16 वर्षांच्या या मुलीने 10 वर्षापूर्वी घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला जगभरात लोकप्रियता मिळाली. नीलांशीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे की, जगातभरात तिचे सगळ्यात लांब केस आहेत. तिच्या केसांची लांबी 5 फुट 7 इंच आहे. तिने 10 वर्षांपूर्वी शेवटचे केस कापले होते.

 


तिने सांगितले की, तिने 10 वर्षांपूर्वी शेवटचे केस कापले होते, तेव्हा तिला खुप वाईट वाटले होते. केस कापल्यामुळे तिचा लुक बदलला होता तेव्हा तिने निर्णय घेतला की, यापुढे केस कापायचे नाहीत.

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नीलांशी पटेलचा एक व्हिडिओ जारी केला आहे, त्यात ती केसांना एका हातात पकडताना दिसते.

 

नीलांशीच्या आधी हा रेकॉर्ड अर्जेंटीनाच्या 17 वर्षीय अबरिल लोरेनजातीच्या नावावर होता. तर सगळ्यात लांब केसांच्या महिलेचा रेकॉर्ड चीनच्या शी क्विपिंगच्या नावावर आहे, त्यांच्या केसांची लांबी 18 फूट 5 इंच आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा नीलांशीचे फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...