हेल्थ / सिझेरियन प्रसूतीनंतर फिट राहण्यासाठी याकडे लक्ष द्या

बाळंतपणानंतर पूर्णपणे ठीक होण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स.

दिव्य मराठी

Jan 14,2020 12:20:00 AM IST

सामान्य प्रसूतीपेक्षा सिझेरियन प्रसूतीमध्ये रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो. बाळंतपणानंतर पूर्णपणे ठीक होण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स.


1. स्तनपान

स्तनपान केवळ बाळासाठीच नव्हे तर आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी प्रभावी असते. सिझेरियन प्रसूतीमूळे बाळाला स्तनपान करण्यासाठी त्रास होतो. अशा वेळेस घरातील सदस्याची मदत घ्यावी शिवाय स्तनपानाच्यावेळी उशीचा आधार घ्यावा.


2. बद्धकोष्टता टाळा

पचनक्रिया बरोबर असणे गरजेचे आहे. यासाठी फायबरयुक्त आहार घ्यावा. प्रसूतीनंतर पोट स्वच्छ राहिल्याने माता आणि बाळ निरोगी राहते. पोटावर ताण येत नाही आणि जखमा लवकर बऱ्या होतात. जर वेदना होत असतील तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधी घ्यावेत स्वत:च्या मनाने घेऊ नये.


3. सकाळी फिरायला जावे

सी-सेक्शननंतर रिकव्हरी वेगात होण्यासाठी नियमितपणे फिरायला जाणे गरजेचे आहे. यासाठी उंच ठिकाणी जाण्याऐवजी सपाट जमिनीवर फिरायला जाणे. यामुळे शरीरात रक्ताभिसरणक्रिया सुधारते आणि शरीर फिट राहते. टाके लवकर विरघळतात. वजन कमी करण्यासदेखील मदत होते.


4. संसर्गापासून दूर राहा

प्रसूतीनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे स्त्रियांमध्ये इन्फेक्शन आणि आजार होण्याचा धोका असतो. त्यासाठी इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये स्त्रिया स्नान करत नाहीत. यामुळेदेखील इन्फेक्शन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

X
COMMENT