Maharashtra Flood / समोर मृत्यू दिसत असताना आम्ही आपल्या बांधवांसाठी मदतकार्य करीत राहिलो आणि अडकलेल्या हजारोंना बाहेर काढले- दत्तात्रय चव्हाण मच्छीमार युवक


कंदर येथे ग्रामस्थांच्या वतीने मच्छीमार तरुणांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला

गणेश जगताप

Aug 13,2019 04:41:00 PM IST

कंदर- समोर मृत्यू दिसत असतानाही आपले बांधव अडचणीत असल्याचे पाहून आम्ही आमची पर्वा न करता नागरिकांना बाहेर काढत गेलो. यात 3 दिवसात जवळपास 9 हजार नागरिकांना बाहेर काढले. शासनाने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सर्वांनी आपले सांगलीकर बांधवांना वाचण्याचे काम केले व त्याचा आम्हाला आनंद आहे, असे प्रतिपादन मदतकार्यात सहभागी असणाऱ्या दत्ता चव्हाण या मच्छीमार तरुणाने केले.

कंदर येथे ग्रामस्थांच्या वतीने मच्छीमार तरुणांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली येथून आलेल्या मच्छीमार व विशेष पट्टीतील पोहणाऱ्या तरुणांचा यावेळी कंदर गावकऱ्यांच्या वतीने विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भास्कर भांगे हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांच्या हस्ते मच्छीमार यांचा प्रशस्तीपत्र व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यांनी मागील 4 दिवसांपासून सांगली येथे अडकलेल्या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोचवण्याचे कार्य केले.
यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर म्हणाले की, पूरग्रस्त सांगली येथे आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कंदर व रामवाडी येथील ग्रामस्थ मच्छीमारांनी 9 हजाराच्या आसपास पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोचवण्याचे मोठे धाडसाचे कार्य केले. सर्वात मोठी कामगिरी या मच्छीमार बांधवांनी केली आहे. ह्यांनी अनेकांना जगवायचे काम केले. ते खरोखरच नायक आहेत. ह्यांनी मोठ्या धाडसाने हे मदतकार्य पार पाडले. तर करमाळा तालुक्यातील अनेक गावांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला.


मदतकार्याच्या या पथकात तलाठी उमेश बनसोडे, कोतवाल नितीन हत्तीकट, रामभाऊ चव्हाण, धनाजी नागनाथ माने, शंकर माने, लखन चव्हाण, राहुल जाधव, सागर शिरतोडे, दशरथ बोडरे, संतोष माने, राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे, सखाराम माने, नागनाथ माने आदींचा समावेश होता. सांगली येथे पूरग्रस्तांना वाचविण्याचे मोठे कार्य केल्याबद्दल करमाळा तालुक्यातून कंदर येथील ग्रामस्थ व मच्छीमारांचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी दीपक चव्हाण, दादासाहेब पाटील, सचिन बिचतकर, तलाठी उमेश बनसोडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमासाठी सरपंच भास्कर भांगे, आदिनाथचे माजी व्हा चेअरमन नानासाहेब लोकरे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, माजी सरपंच आजीनाथ शिंदे, माजी संचालक नवनाथ शिंदे, दादासाहेब पाटील, विजय नवले, शिवशंकर माने, दीपक चव्हाण, सचिन बिचतकर, आनंद शिंदे, गौरव कुलकर्णी, मच्छीन्द्र वागज, संतोष माने, नाना लोकरे, नितीन जाधव, विजय यादव, व ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

X
COMMENT