आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठग्ज ऑफ हिंदोस्तान/ सरड्यासारखा आहे आमिरचा लूक, फातिमाला तयार करण्यासाठी लागत होते 6 तास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकार कुलकर्णी, मुंबई. यशराज फिल्मच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखचा एक वेगळा अवतार पाहायला मिळतोय. चित्रपटाची कॉस्ट्यूम डिझायनर रुशी शर्मा आणि मनोशी नाथने या सर्व चित्रपटाच्या लुक्सविषयी सविस्तर सांगितले आहे. 

 

बहुरुपिया बनला आहे आमिर खान 
- चित्रपटात आमिर एका डाकूच्या भूमिकेत आहे. तो ज्या हजार लोकांना भेटला आहे, त्यांच्यातील सर्व गुण घेऊन त्याचे व्यक्तीमत्त्व साकारण्यात आले आहे. रुशीने सांगितले की, चित्रपटात फिरंगीला त्याच्या नावावर खुप प्रेम आहे. तो एक टोपी नेहमी घालतो आणि विदेशी दारु आपल्याजवळ ठेवतो. ही दारुही चोरलेली आहे. 
- रुशीने पुढे सांगितले की, चोरी करणे ही त्याची ओळख तर आहेच यासोबतच त्याची पर्सनॅलिटी सरड्यासारखी आहे. आमिर चित्रपटात जेड कलरचा टेलकोट घालून दिसतो. हा सरड्याचा कलर असतो. फिरंगीची सत्यता म्हणजे तो एक सरड्यासारखा आहे. तो प्रत्येक वेळी आपले रंग बदलत असतो. फिरंगीची रंग बदलणारी पर्सनॅलिटी त्याच्या कपड्यांमधून दिसते. कारण तो इंग्लिश जॅकेटसोबत बरगंडी आणि धोती घालतो.

 

शेतकरी योध्दा अमिताभ बच्चन 
- अमिताभ बच्चन या चित्रपटात इंग्रजांविरुध्द जंग छेडणारे एक खुदाबख्श नावाच्या योध्द्याच्या भूमिकेत आहेत. स्वतःला शेतकरी म्हणून घेणे त्यांना आवडते. डिझायनर मनोशी नाथ सांगतात की, आम्ही चामडाच्या कवचच्या माध्यमातून चारित्र्यातील सॉफ्टनेस आणि उग्रता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या कवचामध्ये धातु आणि चामडाचा वापर करुन शोल्डर एक्सटेंशन बनवले आहेत. 


- बिग बी चित्रपटात अनेक स्टंट करताना दिसले आहेत. यामुळे त्याचा कॉस्ट्यूम हलका आणि आरामदायक असणे गरजेचे होते. यामुळे आम्ही रबर आणि चामडाचा वापर केला. चमडा आणि रबरच्या कॉम्बिनेशनने तयार केलेला कॉस्ट्यूम मजबूत आणि हलका असतो. ड्यूब्लीकेट हत्यार एकदम ख-या हत्यारांसारखे दिसतात.

 

फातिमाला ड्रेसअप होण्यासाठी लागत होते 6 तास 
- डिझायनर मनोशीने सांगितले की, चित्रपटात फातिमा एक योध्दाच्या भूमिकेत आहे. यामुळे तिला आपला ड्रेस स्किनप्रमाणे कॅरी लागत होता. मनोशीने सांगितले की, आम्ही ते कवच तिच्या बॉडीवर शिवले होते. फातिमाच्या बॉडीवर कापडाच्या 4 ते 5 लेयर असायच्या. तिला प्रत्येकवेळी शूटिंगपुर्वी हे घालावे लागत होते.
- जाफिराच्या ड्रेसची कटिंग आणि शिलाई करण्याऐवजी आम्ही त्याचा कॉस्ट्यूम ड्रेपिंग आणि गाठ बांधून स्किन फिट करत होतो. जाफिराला प्रत्येकवेळी ड्रेसअप करण्यासाठी 5-6 तास लागत होते. पण फातिमा खुप पेशेंस ठेवणारी आहे.

 

मंत्रमुग्ध करणारी कतरिना सुरैया
- चित्रपटात कतरिना बोल्ड सुरैयाच्या भूमिकेत आहे. सुरैया जान, ही या जगात आपले सौंदर्य आणि अदांपुढे कुणालाही वेड लावते. तिला पाहणारा मंत्रमुग्ध होतो. फिरंगी आणि सुरैया एकसारखेच आहेत.
- रुशीने सांगितले की, आमिर आणि कतरिना दोघंही गोड बालून काम काढून घेण्यात तरबेज आहेत. यामुळे दोघांमध्ये खुप साम्य आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...