आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगाव शिवारामध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट; पोलिसांनी नेवाशात टोळीला केले गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - नागपूर-मुंंबई महामार्गालगत शुक्रवारी बेलगाव शिवारात कारमधील प्रवाशांंना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून कारसह रोकड व सोन्याचा ऐवज लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या चार जणांच्या टोळीस नगर स्थानिक गुन्हे शाखा व नगर पोलिसांनी शनिवारी पकडले. दिनेश पुंड, कुणाल धोटे, राकेश खरपकर, दिनेश वानखेडे, जगदीश भारती (सर्व रा. भिष्णुर, ता. नरखेड, जि. नागपूर) हे कार (एमएच ४० बीजे ०९४७) ने देव दर्शनासाठी निघाले होते.


नागपूर-मुंबई महामार्गालगत असलेल्या बेलगाव शिवारात पोहचताच कार  (एमएच१४ सी झेड ९२९४)  चालकाने त्यांच्या कारसमोर आपले वाहन आडवे लावले. त्या वाहनातून चौघेजण खाली उतरले.  या सर्वांनी  त्यांच्याजवळील लोखंडी रॉडसह इतर धारदार शस्त्रांचा कारमधील  प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्या जवळून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या वस्तू, २० हजार ६०० रुपयांची रोकड, दोन मोबाइल संच व पाच लाख रुपये किंमतीची कार असा एकूण सहा लाख ५० हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज लुटून धूम ठोकली होती.  नगर पोलिसांनी सापळा रचून नेवासा तालुक्यातील खुणेगाव परिसरात आरोपींना  शिताफीने पकडले. एरीयल ऊर्फ आर्यन कांतीलाल काळे (२०, रा. लिंबेजळगाव, ता. गंगापूर), सुंदरसिंग ऊर्फ गुलब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव ता.नेवासा), सुनील बाबा खान भोसले (१८, रा.गोंडेगाव ता.नेवासा), श्रावण रत्तन चव्हाण (२०, रा. टेलगेट तालखेड ता.माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. तर अजय मिरीलाल काळे (रा. गाढवनाला ता.नेवासा) हा फरार झाला आहे.