आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजूर-जालना रोडवर तलवारीने वार करून सोने व्यापाऱ्याला लुटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजूर - सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरून पाठलाग करून तलवारीने वार करून लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या वेळी जालना - राजूर रोडवर घडली. विनय बाफणा, नवनीत बाफणा असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव आहे.


जालना शहरातील विनय बाफणा यांचे राजूर येथे सोन्याचे दुकान असून ते त्यांचा मुलगा नवनीत याच्यासह जालना येथून राजूरला नियमित ये-जा करतात. या ठिकाणी त्यांची सोन्या-चांदीची दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी दुकान बंद करून ते जालन्याकडे निघाले होते. या दरम्यान त्यांनी राजूर येथील चौफुली सोडल्यानंतर त्यांच्या कार च्या समोरून एक तर मागच्या बाजूने एक अशा दोन कारने त्यांच्यावर पाळत ठेवली. या तीनही कार जवळपास वीस किमी अंतरावर आल्यानंतर घानेवाडी फाट्याच्या शिवारातील पुलावर समोरील कारने ब्रेक लावले, तर मागच्या कारने बाफणा यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. या वेळी स्कोडा कारमधील तीन ते चार जणांनी हातात तलवार तसेच बंदूक घेऊन विनय बाफणा यांना गाडीतील ऐवज देण्याची मागणी केली. त्यांना विरोध केल्यानंतर विनय बाफणा यांच्या हातावर तलवारीने वार केले, तर मुलगा नवनीत यालाही जखमी केले. या वेळी बाफणा यांच्या कारच्या काचा फोडून सोने- चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. दरम्यान, आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...