आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूसाठी पैसे हवेत म्हणून तळीरामांनी ट्रक अडवून चालकास लुटले; पोलिसांनी पाठलाग करत दोघांना पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी  - परळीहून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकला अडवून चालकाला लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे टोकवाडीजवळ घडली. दारुला पैशांसाठी दोन तळीरामांनी ही लूट केली. गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करुन दोन्ही मद्यपींना गजाआड केले.


उदगीरहून माल भरुन परळीमार्गे वाजेद पठाण हे आपल्या ट्रकमधून (क्र एमएच २६, एच ८५८२) जालन्याकडे जात होते. मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास टोकवाडीजवळ त्यांच्या ट्रकला दोन जणांनी अडवले. वाजेद पठाण यांना बांबूच्या काठीचा धाक दाखवत त्यांच्याकडील २ हजार ८०० रुपये घेऊन दोघांनी पोेबारा केला. याच वेळी परळी ग्रामीण पोलिस या परिसरात गस्त करत होते. वाजेद यांना लुटताना पोलिस वाहनाच्या सायरनचा आवाज ऐकून पळून जाणारे दोघे पोलिसांच्या नजरेस पडले. एक किलोमीटर पाठलाग करुन पोलिसांनी दोघांना अटक केली. अभिमान रोडे व तुकाराम रोडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे हवेत म्हणून ट्रक चालकाला लुटले होते. या प्रकरणी दोघांविरोधात परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...