आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी घरच्या घरीच केले गणरायांचे विसर्जन; म्हणाले, श्रीगणेशाला डीजे-डॉल्बीची गरज नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुणे आणि अहमदनगरसह राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी डीजे आणि डॉल्बीची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यास स्पष्ट विरोध केला. श्रीगणेशाला डॉल्बी किंवा डीजेची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात विविध ठिकाणी गणेश मंडळांनी डीजेच्या मागणीसाठी विसर्जनावर बहिष्कार घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची मानली जात आहे. डीजे डॉल्बीची गरज फक्त आपल्यालाच असते. आपल्या उत्साहासाठी असते असेही ते पुढे म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब वर्षा बंगल्यावर घरच्या घरीच गणरायांचे विसर्जन केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणेश विसर्जनाचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...