आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशीमध्ये पहलादेश्वर मंदिरात भगवान शंकरालाही मास्क घातला, मूर्तीला स्पर्श न करण्याच्या सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - देशात कोरोना व्हायरसचे मामले समोर आल्यानंतर सर्व स्तरावर दक्षता घेतली जात असून, त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मंदिरेही मागे नाहीत, असे दिसून आले आहे. काशीतील पहलादेश्वर येथील महादेव मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीलाही मास्क चढवण्यात आला असून, त्याव्दारे भाविकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले. याबाबत बोलताना मंदिराचे पुजारी कृष्णा आनंद पांडे म्हणाले, कोरोना व्हायरसची देशात भीती निर्माण झाली असून, भाविकांमध्ये या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही भगवान शंकराला मास्क घातलेला आहे. उन्हाळ्यात आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात एसी लावतो आणि थंडीत भगवान शिवाला कपडे घालतो. लोकांनी या मूर्तीला शिवून दर्शन घेऊ नये, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत. कारण याव्दारे व्हायरस पसरू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.

भये इथले संपत नाही... विमानालाही मास्क घातला
कोरोना व्हायरसची भीती जशी लोकांमध्ये पसरली आहे, तसे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे अभिनव प्रकारही अवलंबले जात आहेत. गुजरातेत आठवा गेट परिसरातील प्लेन सर्कलमध्ये ठेवलेल्या विमानालाही कोरोना व्हायरस मास्क चढवण्यात आला आहे. हा मास्क १४ फूट लांब आणि ५ फूट रूंद आहे. या वर्दळीच्या परिसरातून हजारो लोक रोज येत-जात असतात. त्यांच्यात कोरोना व्हायरसबाबत जागृती व्हावी, या हेतूने हा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. तसेच याबाबत जागरूकता निर्माण करणारे फलकही लावण्यात आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...