आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोपर्यंत मनात इच्छा राहतील, तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलीजन डेस्क- दर वर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या वर्षी पंचांग भेदामुळे 23 आणि 24 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाईल. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले होते. गीतेत 18 अध्याय आहेत, ज्यात अंदाजे 700 श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनला जे ज्ञान दिले, ते आजही आपल्या आयुष्यातील परेशानी दूर करू शकतात. जर गीतेत सांगितलेल्या गोष्टींना जीवनात वापरल्या तर आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहचता येते. जाणून घ्या गीतेतील काही नितींबद्दल...
 

"विहाय कामान् य: कर्वान्पुमांश्चरति निस्पृह:।
निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति।।
"
अर्थ- जो व्यक्ती आपल्या सर्व इच्छांना सोडून देतो आणि अहंकार मुक्त होऊन आपल्या कर्तव्यांचे पालन करतो, त्याला शांती मिळते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनात कोणत्याही प्रकारच्या इच्छा आणि कामना ठेवल्याने माणसाला शांती प्राप्त होत नाही. त्यामुळेच शांती मिळवण्यासाठई मनातील इच्छा कमी कराव्या लागतात. आपण जे कर्म करतो, त्याच्यासोबत फळाची इच्छ करतो. जेव्हा आपल्या इच्छोनुसार फळ मिळत नाही, तर मग आपले मन आणखीन अशांत होते. त्यामुळे कर्म करा, फळाची इच्छा करू नका. तेव्हाच मन शांत होईल.
 

"न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यश: कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणै:।।
"
अर्थ- कोणताही व्यक्ती क्षणभरही काही न करता राहू शकत नाही. सर्व प्राणी प्रकृतीच्या आधीन आहेत आणि प्रकृती आपल्या अनुसार प्रत्येक प्राण्यापासून कर्म करुन घेते आणि त्याचा परिणामही देते. वाईट परिणाण होईल या भीतीने काहीच केले नाही, तर त्या व्यक्तीचे जीनव व्यर्थ आहे. काही न करणे, हेदेखील काहीतरी करणे आहे, ज्याच्या फळ रुपात आपल्याला अपयश मिळते. त्यामुळेच कधीही आळस न करता आपले कर्म करत राहा.