Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | lord Krishna and draupadi story about pandavas life saving

पतीच्या सुखासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले एक रहस्य, जे प्रत्येक पत्नीने ठेवावे लक्षात

रिलिजन डेस्क | Update - Dec 05, 2018, 12:02 AM IST

महाभारत युद्ध चालू होते आणि भीष्म पितामह यांनी दुसऱ्या दिवशी सर्व पांडवांचा वध करणार अशी घोषणा केली, पांडवांच्या रक्षणास

 • lord Krishna and draupadi story about pandavas life saving

  महाभारत युद्धाच्या सुरुवातीलाच दुर्योधनने कौरवांचे सेनापती भीष्म पितामह यांना वारंवार टोचून आणि कटू बोलणे सुरु केले होते. यामुळे दुःखी झालेल्या पितामह भीष्म यांनी घोषणा केली, उद्या ते सर्व पांडवांचा वध करतील. ही गोष्ट पांडवांना समजल्यानंतर ते चिंतीत झाले कारण पितामह भीषण यांना पराभूत करणे शक्य नव्हते. त्याचदिवशी सूर्यास्ताच्या वेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला सोबत एका ठिकाणी घेऊन गेले.


  > श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्म पितामह यांच्या शिविराबाहेर गेले आणि सांगितले शिविरात जाऊन पितामह भीष्म यांना नमस्कार कर. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदी भीष्म पितामह यांच्याकडे गेली आणि नमस्कार केला. भीष्म यांनी आपल्या कुलवधुला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला.


  > त्यानंतर भीष्म यांनी द्रौपदीला एवढ्या रात्री एकटी कशी आलीस असे विचारले? श्रीकृष्ण तुला येथे घेऊन आले आहे का?


  > द्रौपदी म्हणाली - हो पितामह, मी श्रीकृष्णासोबत आले असून ते शिविराबाहेर उभे आहेत.


  > हे ऐकताच भीष्म लगेच द्रौपदीला घेऊन शिविराबाहेर आले आणि श्रीकृष्णाला नमस्कार केला. भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले की, माझ्या एक वचनाला दुसऱ्या वचनाने तोडण्याचे काम श्रीकृष्ण तुम्हीच करू शकता.


  > त्यानंतर श्रीकृष्ण आणि द्रौपदी आपल्या शिविराकडे निघाले. रस्त्यामध्ये श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले की आता सर्व पांडवांना जीवनदान मिळाले आहे. मोठ्यांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणे काम करतो. आज तू एकदाच पितामह यांना नमस्कार केलास आणि सर्व पांडव सुरक्षित झाले. जर तू दररोज भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना नमस्कार केला असता आणि दुर्योधन-दुःशासनच्या पत्नींनी पांडवांना नमस्कार केला असता तर आज युद्धाची स्थिती निर्माण झाली नसती.


  कथेची शिकवण - पतीच्या सुखासाठी पत्नीने आपल्या कुळातील सर्व मोठ्या लोकांना आदर द्यावा. मोठ्याच्या आशीर्वादाने पती सर्व दुःखांपासून दूर राहतो. बहुतांश घरांमध्ये याच कारणामुळे कलह होतो की पत्नी आपल्या पतीच्या आई-वडिलांचा मान-सन्मान करत नाही. पत्नीने या गोष्टीकडे लक्ष दिले तर घरात शांतता कायम राहते.

Trending