श्रावण / पूजन सामग्री - एकच बिल्वपत्र अनेक दिवस वारंवार शिवलिंगावर अर्पण करू शकता

अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या तिथीला तोडू नयेत बेलाची पाने

दिव्य मराठी

Aug 07,2019 12:10:00 AM IST

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते. शिवपुराणानुसार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहेत. महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे बेलाचे पान. शिवलिंगावर केवळ बेलाचे पानं अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार बेलाच्या पानांशी संबंधित काही खास गोष्टी...


> कोणत्याही दिवशी आणि तिथीला विकत आणलेली बेलाची पाने पूजेसाठी नेहमी वापरू शकता.
> शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते, उत्तर-दक्षिण दिशेला असल्यास सुख-शांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते.


> शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे मानले गेले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेने सर्व देवांच्या पूजेचे पुण्य मिळते.
> घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात. या दाराच्या प्रभावाने सर्वांना यश प्रत होते. मान-सन्मान मिळतो. असे शास्त्रामध्ये वर्णित आहे.


> शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होतो.
> महिन्यातील अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा तिथीला बेलाची पान तोडू नयेत. या तिथींच्या एकदिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता.


> शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात.
> एखाद व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिव मंत्र ऊँ नम: शिवाय चा जप करत 51 बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावेत. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

X