Home | Jeevan Mantra | Dharm | lord shri krishna life management tips for success

सक्सेस मिळवण्यासाठी कधीही चुकीच्या मार्गावर चालू नये, नेहमी लक्षात ठेवा या 3 गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Dec 06, 2018, 12:04 AM IST

भगवान श्रीकृष्णाने ठरवले असते तर एकाच दिवसात जिंकले असते महाभारत युद्ध, पांडवांच्या सैन्यात कोणीही मारले गेले नसते, परंत

 • lord shri krishna life management tips for success

  काही लोक यश प्राप्तीसाठी शॉर्टकटचा वापर करतात परंतु शॉर्टकटमुळे मिळालेले यश जास्त दिवस टिकत नाही. यामुळे दीर्घकाळ यशस्वी राहायचे असल्यास शॉर्टकटपासून दूर राहा. स्वतः संघर्ष करून प्राप्त केलेलेच यशच स्थायी राहते.


  श्रीकृष्ण एकाच दिवसात जिंकू शकत होते महाभारत युद्ध
  > महाभारत युद्ध एकटे श्रीकृष्ण एकाच दिवशी जिंकू शकत होते, परंतु त्यांनी केवळ पांडवांचे मार्गदर्शन केले. त्यांनी ठरवले असते तर पांडवांचा एकही सैनिक युद्धामध्ये मारला गेला नसता आणि युद्ध जिंकले असते.


  > अर्जुनानेसुद्धा श्रीकृष्णाकडे फक्त मार्ग दाखवण्याची विनंती केली. युद्धामध्ये तो स्वतःच्या बळावर विजय प्राप्त करण्यास इच्छुक होता. पांडवांनी संपूर्ण युद्धामध्ये कोणतेही अधर्म केले नाही आणि नियमही तोडले नाहीत. ते केवळ श्रीकृष्णाने सांगितलेल्या मार्गावर चालत राहिले.


  > याचे कारण म्हणजे श्रीकृष्णाने युद्ध जिंकून युधिष्ठिरला राजा बनवले असते तर पांडवांना त्या विजयाचे मूल्य कधीही लक्षात आले नसते. यशासोबतच शांती आणि संतुष्टी हे दोन्ही भाव असणे आवश्यक आहे.


  > आपण अशांत आणि असंतुष्ट असण्याचा अर्थ यश प्राप्तीसाठी आपण एखादा शॉर्टकट निवडला आहे. शॉर्टकटने मिळवलेले यश अस्थायी असते आणि यामुळे आपले मनही अशांत राहते.

  हे आहेत लाईफ मॅनेजमेंटचे 3 सूत्र...
  1. यश प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.
  2. कामामध्ये उशीर झाला तरी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत राहावा.
  3. तुम्हाला मदत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला विसरून जाऊ नये.

Trending