आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य वृषभमध्ये : 12 पैकी 9 राशींसाठी राहील शुभ, इतर 3 राशींनी सांभाळून करावे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 15 मे रोजी दुपारी ग्रहांचा राजा सूर्य राशी परिवर्तन करत आहे. हा ग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सध्या मेष राशीमध्ये सूर्यासोबत होता. सूर्यामुळे उष्णतेचा प्रकोप आणखी वाढेल. मंगळ-राहूची युती मिथुन राशीमध्ये आहे आणि शनी-मंगळाची एकमेकांवर दृष्टी असल्यामुळे भूकंपन योग जुळून येत आहे. सोन्या-चांदीचे भाव वाढतील आणि पाण्याच्या कमतरतेमुळे जनता त्रस्त होऊ शकते.


या राशींवर सूर्याचा राहील शुभ प्रभाव
मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याची ही स्थिती शुभ राहील. या लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याचे योग आहेत.


या राशींवर राहील अशुभ प्रभाव 
मिथुन, सिंह, धनु राशीच्या लोकांवर सूर्याचा अशुभ प्रभाव राहील. यामुळे कार्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. खूप कष्ट करूनही मनासारखे फळ प्राप्त होणार नाही. मानसिक तणाव कायम राहील. सध्या धैर्य बाळगून काम करण्याचा हा काळ आहे.


सूर्यदेवाच्या कृपेसाठी रोज करावीत ही कामे
सूर्याचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आणि शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. सूर्य मंत्र ऊँ सूर्याय नम: मंत्राचा उच्चार करावा. वेळोवेळी गुळाचे दान एखाद्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला करावे.