आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी जर सूर्यदेवाचे दर्शन झाले नाही तर पूर्व दिशेला मुख करून अर्घ्य द्यावे आणि सूर्य मंत्र म्हणावा

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

सध्या पौष मास सुरु असून या महिन्यात सूर्यदेवाची विशेष पूजा करण्याची प्रथा आहे. शास्त्रामध्ये पंचदेव सांगण्यात आले आहेत. यांची पूजा प्रत्येक कामाच्या सुरुवातीला केली जाते. हे पंचदेव भगवान शिव, श्रीविष्णू, श्रीगणेश, देवी दुर्गा आणि सूर्यदेव आहेत. सूर्यदेव प्रत्यक्ष दिसणारे देवता आहेत. यामुळे यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी तांब्याच्या कलशाने अर्घ्य देणे. गीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षीत भविष्य पुराणानुसार सूर्यदेवाला अर्घ्य देताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते... > पं. शर्मा यांच्यानुसार सकाळी जर ढगांमुळे सूर्याचे दर्शन होत नसेल तर सूर्योदयाच्या पूर्व दिशेकरे मुख करून अर्घ्य द्यावे. सूर्य मंत्राचा जप करावा. मंत्र : ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्याय नम:, ऊँ भास्कराय नम: इ. ब्राह्मपर्वच्या सौरधर्ममध्ये सदाचरण अध्यायानुसार, जे लोक सूर्यदेवाला जल अर्पण करतात, त्यांनी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. > घराबाहेर पडल्यानंतर सूर्य मंदिर दिल्यास थांबून अवश्य नमस्कार करावा. सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा. > सूर्यदेवासाठी रविवारी गुळाचे दान करावे. जल अर्पण करताना सूर्याकडे थेट पाहू नये. जमिनीवर पडणाऱ्या पाण्यातून सूर्यदेवाकडे पाहत दर्शन घ्यावे. > ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती ठीक नसेल त्यांनी रोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे सूर्यदोष दूर होऊ शकतात. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. > तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असल्यास किंवा अभ्यासात मन लागत नसल्यास सूर्यदेवाला गुरु मानून पूजा करावी. तांब धातूपासून सूर्य मूर्ती तयार करून घरात ठेवल्यास तुमच्या विविध अडचणी दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...