हॉट डॉगवरुन झालेले / हॉट डॉगवरुन झालेले भांडण एवढे वाढले की, दोन महिलांच्या तोंडात दिले पंच, लोक उभे राहून पाहत राहिले आणि पळून गेली हल्ला करणारी व्यक्ती 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 02,2019 12:00:00 AM IST

व्हिडिओ डेस्क. लॉस एंजिलिस पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये एक अज्ञात व्यक्ती दोन महिलांच्या चेह-यावर वाईट प्रकारे पंच मारताना दिसतोय. पोलिसांनुसार 26 जानेवारीच्या रात्री शहराच्या पर्सिंग स्क्वायरच्या फूड एरियामध्ये ही घटना घडली. येथील उपस्थित लोकांनी सांगितले की, सर्वात पहिले हल्ला करणारी व्यक्ती आणि वेटरमध्ये हॉट डॉग सर्व्ह करण्याविषयी वाद सुरु झाला. वेटरने त्या व्यक्तीपुर्वी दोन महिलांना हॉट डॉग सर्व्ह केले. यामुळे ती व्यक्ती भडकली आणि त्या महिलांसोबत भांडू लागली. याचवेळी त्याने महिलांच्या चेह-यावर जोरदार पंच लावला आणि पळून गेला.


लाजिरवाणे : कुणीही केली नाही मदत
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित लोकांपैकी कुणीही महिलेची मदत केली नाही आणि त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. पोलिस आता या व्यक्तीचा शोध घेत आहेत. तर या दोन्ही महिलांना प्राथमिक उपचारांनंतर रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.


X
COMMENT