आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक्ट ऑफ गॉड':केरळ पुरात जागेवरच भंगार झाल्या 357 ब्रँड न्यू लक्झरी कार, पाहा काय म्हटले इंश्युरन्स कंपनीने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - केरळच्या पुरात झालेल्या नुकसानींचे एक एक चित्र सध्या समोर येत आहे. थ्रिसूर येथील एका कार शोरूममध्ये ठेवलेल्या 357 कार पुरामुळे जागेवरच भंगार बनल्या. इंश्युरन्स कंपनीने याला टोटल लॉस म्हटले आहे. इंश्युरन्स सर्वेअर्स मारूती कारचे डीलर बीआरडी कार वर्ल्डमध्ये यूज्ड कार नव्या गाड्यांचे सर्वेक्षण करत आहेत. नॅशनल इंश्युरन्स कंपनीचे मॅनेजर म्हणाले की, नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीसाठीही इंश्युरन्स क्लेम करता येतो. पण त्यासाठी तशी पॉलिसी इंश्युरन्सच्या वेळी घ्यायला हवी. पण या गाड्या आता पुन्हा शोरूमध्ये जाणार नाही, हे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतर लोकही त्या स्वस्तात खरेदी करू शकतात. त्यासाठी अनेकांची चर्चा सुरू आहे. 


डेशबोर्ड लेव्हलपर्यंत शिरले होते पाणी 
या गाड्या पुराच्या पाण्यात पूर्ण बुडाल्या होत्या. हे सी कॅटेगरी डॅमेज ठरत असते. कारण पाणी डॅशबोर्ड लेव्हरपर्यंत आले होते. या गाड्यांची ओरिजनल मार्केट व्हॅल्यू 28 कोटींपेक्षा जास्त आहे. या शोरूममध्ये 500 नव्या कार होत्या. पण काही वेळीच पाण्यातून काढण्यात आल्या. पण या गाड्या नव्या गाड्यांसारख्या विकल्या जाणार नाहीत. त्या पुन्हा कोणत्याही शोरूममध्ये जाणार नाहीत. या पुरमध्ये जवळपास 1 हजार नव्या कार आणि 7 ते 8 हजार कस्टमर कारचे नुकसान झाले आहे. 


काय आहेत इंश्युरन्सचे नियम 
- तज्ज्ञांच्या मते नैसर्गित संकटामुळेही गाड्यांचे नुकसान झाले तर त्यालाही विम्याचे संरक्षण मिळते. पण कोणती पॉलिसी घेतली आहे यावर ते अवलंबून असते.
- त्याचप्रमाणे गाडीचे इंजिन प्रोटेक्शन कव्हर असेल तर पाण्यात बुडाल्यानंतरही क्लेम करता येते. पण गाडी स्टार्ट करू नये. बुडाल्यानंतर गाडी स्टार्ट केली तर कंपनी क्लेमला नकार देऊ शकते. 
- कोणत्याही गाडीच्या किमतीच्या 75 टक्के लायबिलिटी निघत असेल तर त्याला टोटल लॉस समजले जाते. 

बातम्या आणखी आहेत...