आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गार्डनमधून येत होता रडण्याचा आवाज, दाम्पत्याने जाऊन बघितले असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनचेस्टर : इंग्लंडच्या ऑफर्टन येथे राहणाऱ्या एक जोडप्याला आपल्या गार्डनमध्ये एक खूपच आजारी मांजर सापडली. त्यांनी तिला रूग्णालयात नेले असता मांजरीच्या गळ्यातील एका चिपद्वारे तिच्याशी निगडीत असलेले एक रहस्य उलगडले. ही मांजर 11 महिन्यांपासून आपल्या मालकाच्या घरातून बेपत्ता होती. तेव्हापासून ते तिचा शोध घेत होते. तसेच ती मिळण्याची आशा देखील त्यांनी सोडली होती. पण जेव्हा त्यांना आपल्या बेपत्ता झालेल्या मांजरीची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी खूप आनंद झाला. आपल्या घरापासून 8 किलोमीटर दूर स्टॉकपोर्टच्या ऑफर्टन शहरात ती सापडली होती. 

 

रात्री येत होता गार्डनमधून आवाज 

- मॅनचेस्टर शहरात राहणाऱ्या रेयान फोगार्टी आणि त्याची सहकारी टोनी यांना एका रात्री अचानक आपल्या घराच्या गार्डनमधून एका प्राण्याच्या विव्हळण्याचा आवाज आला होता. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता तेथे एक मांजर त्यांना आढळून आली. 

- मांजर खूप आजारी होती आणि तिचे केसही झडले होते. यानंतर कपलने तिला पाणी आणि उपचारासाठी रूग्णालयात घेऊऩ गेले. 
 
- डॉक्टरांना उपचारादरम्यान तिच्या गळ्यात लावलेली एक चिप मिळाली. यामध्ये तिच्या मालकाचे नाव आणि पत्त्यासोबत तिची सर्व माहिती लिहीलेली होती. दाम्पत्याने चिपवर दिलेल्या नंबरवर कॉल केला असात मांजरीसोबतचा जोडलेले 11 महिने जुने रहस्य उलगडले.  


हा तर ख्रिसमसचा चमत्कार

- रेयानने मांजरीच्या मालकाशी संपर्क साधला असता तिचे नाव पर्सी आहे आणि ती 11 महिन्यांपासून आपल्या मालकाच्या घरातून बेपत्ता झाली असल्याचे समजले. तिच्या खऱ्या मालकाचे नाव हेलेन कॅँपियन होते. पर्सी बेपत्ता झाल्यापासून ती महिला आणि तिचे कुटुंबीय तिला शोधत होते. 

 

- पर्सीचा शोध घेण्यासाठी हेलेनच्या परिवाराने मिसिंगचे पोस्टर सुद्धा लावले होते. सोबतच प्रत्येक घरात चौकशी देखील केली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. इतका शोध घेऊनही तिचा काही पत्ता न लागल्यामुळे तिची परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. पण त्यांना पर्सी सापडल्याचे कळताच त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 

 

- मांजर मिळाल्यानंतर हेलेन म्हणाली की, पर्सीबाबत जे घडले त्यावरून तरी ख्रिसमसचे चमत्कार आजही घडत आहेत. कारण आम्ही जिला मृत झाली असेल असे समजत होतो, ती पुन्हा आपल्या घरी परत आली नसती.