आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक गायब झाले पुर्ण शहर, 1200 वर्षांनंतर समुद्रात गाडलेल्‍या अवस्‍थेत मिळाले याचे अवशेष, पाहून वैज्ञानिकानांही बसला धक्‍का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलेक्‍झांड्रा -  इजिप्‍तमध्‍ये पुर्वी हेराक्लियन नावाचे गजबजलेले शहर होते. मात्र अचानक हे शहर समुद्रात बुडाले व वाळूखाली गाडले गेले. आता तब्‍बल 1200 वर्षांनंतर एका फ्रेंच अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्‍टने या शहराचा शोध लावला आहे. समुद्र तळापासून 30 फुट खोल याचे अवशेष मिळाले आहेत. येथे खोदकाम केले असता आतमध्‍ये अनेक विशाल मुर्ती आणि प्राचिन जहाजं असल्‍याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. यामुळे वैज्ञानिकही हैरान झाले आहेत. हे शहर नेमके समुद्रात कसे बुडाले, हे अजूनही एक कोडेच आहे.


खोदाकामात मिळालेले सामान पाहून वैज्ञानिकही चक्रावले
- अलेक्‍झांड्रियाजवळ अबौकिर बेमध्‍ये भुमध्‍य समुद्रात हे शहर दबलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले आहे. चार वर्षांच्‍या मेहनतीनंतर 2000मध्‍ये फ्रेंच अंडरवॉटर आर्कियोजॉजिस्‍ट डॉ फ्रँक गोडियो आणि युरोपियन इंस्‍टीट्यूट ऑफ अंडरवॉटर टेक्‍नॉ‍लाजीतर्फे याचा शोध लावण्‍यात आला होता.
- 2013मध्‍ये बनवण्‍यात आलेल्‍या एका डॉक्‍युमेंट्रीमध्‍ये येथे 13 वर्षे चाललेल्‍या खोदकामाविषयी पुर्ण माहिती देण्‍यात आली आहे. संशोधनातून समोर आले आहे की, हे शहर केवळ व्‍यापारी केंद्रच नव्‍हते तर एक महत्‍त्‍वाचे धार्मिक केंद्रही होते.
- टेलिग्राफच्‍या रिपोर्टनूसार, संशोधनातून हे समोर आले आहे की, हे शहर भूमध्‍य सागर आणि नीलदरम्‍यान वाहतूकीसाठी एक महत्‍त्‍वाचे पोर्ट होते.
- समुद्राखाली दबलेल्‍या या शहरात 64 प्राचिन जहाजांचे अवशेष आणि जहाजांना पोर्टवर रोखणारे 700 अँकर्सही सापडले आहेत. या‍व्‍यतिरिक्‍त सोन्‍यांचे नाणे आणि मोठमोठे टेबलही आढळून आले आहेत.
- संशोधकांना येथे काही धार्मिक अवशेषही मिळाले आहेत. यात 16 फुट लांब स्‍कल्‍पचरचाही समावेश आहे. शहराच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या मंदिराचा हा एक हिस्‍सा असल्‍याचे मानले जात आहे.


रहस्‍यमीरीत्‍या गायब झाले शहर
- हे शहर कशामुळे गायब झाले, हे कोडे अद्यापही वै‍ज्ञानिकांना उलगडता आलेले नाही. मात्र त्‍यांचा अंदाज आहे की, येथील जमिन ही वाळूमय असावी. शहरातील ईमारतींचे वजन सहन न झाल्‍यामुळे या शहराला जलसमाधी मिळाली असावी.

 

बातम्या आणखी आहेत...