आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेले पाकीट अचानक आले घरपोच, एवढे पैसे पाहून बसला धक्का; परत करणाऱ्याने लिहिले, ऐश कर..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - हरवलेले पैसे किंवा पाकीट कधी परत मिळण्याची अपेक्षाच नसते. परंतु, अमेरिकेतील एका व्यक्तीला त्याचे पाकीट घरपोच मिळाले. पण, कहाणी याच ठिकाणी संपली नाही. हरवलेल्या पाकीटात 60 डॉलर रोख, 400 डॉलरचे पे चेक, बँक एटीएम आणि ओळखपत्र होते. त नाही. सर्वच व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी त्याने चेकिंग सुरू केली. परंतु, पाकीट उघडले तेव्हा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पोस्टाने घरी आलेल्या त्या पर्समध्ये तब्बल 100 डॉलर होते. लोकांचे पर्स हरवतात ते सापडतच नाहीत. सापडले तरी रक्कम मिळेल याची खात्री नसते. परंतु, त्याच्या पर्समध्ये रक्कम वाढून आली. आतमध्ये परत करणाऱ्याने एक सूचना देखील लिहिली होती.


बहिणीच्या लग्नाची तयारी करू शकला नाही...
20 वर्षांचा तरुण हंटर आपले पर्स हरवल्यामुळे चिंतेत होता. गोष्ट केवळ पैश्यांची नव्हती. त्या पाकीटात त्याचे आयडी कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे होती. आपले ओळख पत्र आणि एटीएम हरवल्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारींमध्ये अडथळे आले. सर्वात मोठा अडथळा आयडी कार्ड नसल्याने आला. हंटरला ओहामा या आपल्या शहरात फ्लाइटने परत यायचे होते. परंतु, ओळखपत्र नसल्याने तो फ्लाइटमध्ये बसू शकला नाही. कित्येक तास त्याला कार ड्राइव्ह करून घर गाठावे लागले. दोन दिवसांपूर्वीच हंटरच्या घरी एक पार्सल आले. त्यामध्ये हंटरचे पर्स आणि पत्र होते. 


ऐश कर मित्रा...
पाकीट परत करणाऱ्याने पत्रात लिहिले, "हंटर, मला तुझे पाकीट ओहामा ते डेनव्हरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये सापडले. हे पाकीट सीट आणि प्लेनच्या भिंतीमध्ये अडकलेले होते. मला या पर्समध्ये 60 अमेरिकन डॉलर दिसून आले. परंतु, पर्स परत मिळाल्यानंतर तू यातून पार्टी करू शकणार नाही. म्हणूनच, त्यामध्ये आणखी 40 डॉलर जोडून एकूण 100 डॉलर पाठवत आहे. त्यामुळे, आता चिंता न करता ऐश कर मित्रा..!" पर्स मिळाल्यानंतर हंटर त्यातील रक्कम पुन्हा-पुन्हा चेक करत होता. तो स्वतःशीच संवाद साधून हे शक्यच नाही असे बड-बड करत होता. वेळ न लावता हंटरने त्या देव माणसाला पत्र पाठवून धन्यवाद म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...