Home | International | Other Country | Lottery winner claims prize in mask to hide identity

युवकाने जिंकली 9 कोटी रुपयांची लॉटरी, 54 दिवस रक्कम घेतलीच नाही; समोर आला तेव्हा सगळेच हैराण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 03:08 PM IST

माझे नातेवाइक खूप लोभी आहेत जगू देणार नाहीत, असे तो म्हणाला.

  • Lottery winner claims prize in mask to hide identity

    वॉशिंग्टन - अमेरिकेत मूळचा जमैकाचा असलेल्या युवकाने तब्बल 15 लाख पाउंडची लॉटरी जिंकली. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर ती मिळवण्यासाठी कुणी एक तास सुद्धा वाट पाहू शकणार नाही. परंतु, या बहाद्दराने जवळपास दोन महिने वाट पाहिली. 54 दिवसांनंतर तो आपली जिंकलेली रक्कम मिळवण्यासाठी समोर आला. तोही असा की त्याला पाहून सगळेच हैराण झाले. त्याने आपल्या चेहऱ्यावर विचित्र मास्क लावला होता. आपल्या कपड्यांवरून ओळख पटू नये याचीही काळजी त्याने घेतली होती. एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, त्याचे नाव ए कॅम्पबेल असे आहे. नवीन लोक तर सोडा मित्र-परिवाराला सुद्धा लॉटरी जिंकल्याचा पत्ता लागू नये असा त्याचा हेतू होता.


    माझे सगळेच नातेवाइक लोभी
    > कॅम्पबेल बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी कशा अवतारात पोहोचला याचे काही फोटो लॉटरी कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामध्ये कॅम्पबेल मास्क घालून डान्स करताना आणि मोठा चेक घेऊन इकडून-तिकडे फिरताना दिसून येतो. एवढी मोठी रक्कम जिंकलो याचा पत्ता मित्र किंवा कुटुंबियांना कळायला नको अशी विनंती त्याने केली. त्याने सांगितल्याप्रमाणे, त्याचे नातेवाइक इतके लोभी आहेत की ते मला पूर्ण रक्कम घेऊ देणार नाहीत. सगळेच माझ्या घरी येऊन बसतील.
    > कॅरेबियन देशांमध्ये गरीबी आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. अशात लोकांना लॉटरी लागल्यानंतरही ते आपली ओळख लपवून ठेवतात. कुणालाही घरात पैसे असल्याचा पत्ता लागल्यास अपहरण होईल अशी त्यांना भीती असते. कित्येकांना अशा अचानक मिळालेल्या रकमेमुळे जीव सुद्धआ गमवावा लागला. गतवर्षी जून महिन्यात एका लॉटरी विजेत्याने स्मायली इमोजी घालून 9.5 कोटी रुपये घेतले होते.

Trending