Car launching / लोटसने लाँच केली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार एव्हिजा, ३ सेकंदांत ० वरून १०० किमी प्रति तास गती

या कारची किंमत २० लाख डॉलर (सुमारे १३ कोटी रुपये) आहे

दिव्य मराठी

Jul 20,2019 09:20:00 AM IST

लंडन - ब्रिटिश कार निर्माता कंपनी लोटसने आतापर्यंतची सर्वाधिक शक्तिशाली इलेक्ट्रिक कार एव्हिजा लाँच केली आहे. या कारची किंमत २० लाख डॉलर (सुमारे १३ कोटी रुपये) आहे. १९०० अश्वशक्ती असलेली ही कार केवळ तीन सेकंदांत ० वरून १०० किलोमीटर प्रती तास गती पकडू शकते. या कारची सर्वाधिक गती ३२० किलोमीटर प्रती तास आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार ४०० किलोमीटरपर्यंत चालू शकते. १८ मिनिटांत या कारची बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. या कारचे वजन १६७८ किलो आहे. लोटसच्या सुपर कार श्रेणीतील ही सर्वात हलकी कार आहे. चांगल्या एअरोडायनेमिक्ससाठी या कारचे वजन कमी ठेवण्यात आले आहे. ही कार पिनिनफारिना बतिस्ता आणि रिमॅक सी टूसारख्या सुपर स्पोर्ट््स कारशी स्पर्धा करेल.

X