आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेवून प्रेमी युगुलाची आत्महत्या; बुलडाणा चिखली मार्गावर मालगणी शिवारातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली- तालुक्यातील मालगणी शिवारात खुपगाव येथील युवक व देऊळगाव मही येथील युवती या प्रेमी युगुलाने कैलास मेहरा यांच्या पेरुच्या बगिच्यात ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी १९ ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आली. 


देऊळगाव मही येथील सविता काळुबा ढाकणे वय २० वर्षे व ज्ञानेश्वर विश्वनाथ डुकरे वय २३ वर्षे या दोघांचे काही दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. ज्ञानेश्वर डुकरे हा ढाकणे यांच्या महेंद्रा पीकअप गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. याच दरम्यान त्याचे सविता सोबत प्रेम जुळले. ढाकणे कुटुंब हे सुरत येथे राहत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून ते देऊळगावमही येथे वास्तव्यास आले होते. या ठिकाणी ते कापड विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान शनिवार १८ ऑगस्टपासून हे प्रेमीयुगल घरुन बेपत्ता झाले होते. 


ढाकणे सुरतला राहत असतानाच ज्ञानेश्वर याच्याशी सविताचे प्रेम जुळले होते. सविताचे आई वडील देऊळगावमही येथे दोन वर्षापूर्वी आले. परंतु ज्ञानेश्वर सुरतलाच राहत होता. १५ ऑगस्टला तो खुपगाव येथे आला होता. त्यानंतर तो मालगणी येथे बहिणीच्या गावाला आला.शनिवारी १८ ऑगस्टला सविता आणि त्याची भेट झाली. दिवसभर फिरल्यानंतर त्यांनी कैलास मेहरा यांच्या पेरूच्या बागेत सविताच्या गळ्यातील ओढणीच्या साह्याने दोघांनी एकाच वेळेस पेरूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. या वेळी घटनास्थळी पोलिसांना एक मोबाइल, विषारी औषधाची बॉटल, रिकामी पाण्याची बाटली व दोन पर्स आढळल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेना सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, शैलेश गोंदणे, विनायक सरनाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ हे बुलडाणा चिखली मार्गावर असल्याने त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...