आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात हात बांधून प्रेमी युगुलाने तलावात मारली उडी, ओळख लपवण्यासाठी मोबाईलमधील सिमकार्डही फेकून दिले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानी नागपुरात फुटाळा तलावात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या दोघांची ओळख पटलेली नसून ओळख लपवण्यासाठी त्यांनी मोबाईलमधील सिमकार्ड देखील काढून फेकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. 

 

बुधवारी सकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह तलावात आढळून आले. दोघांचे हात एकमेकांना बांधलेले होते. आत्महत्या करणारा तरुण हा अंदाजे 23 ते 25 वयोगटातील आहे. तर तरुणी 20 ते 22 वयोगटातील आहे. या दोघांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांकडे कुठलेही ओळखपत्र सापडलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ओळख लपवण्यासाठी मोबाईलमधील सिमकार्डही फेकून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. प्राथमिक चौकशीत हा आत्महत्येचाच प्रकार असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्यातून काही माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...