Home | National | Other State | Love jihad allegation by barmer girl on Kashmiri youth in rajasthan

लव जिहादचे चकीत करणारे प्रकरण: अश्लील फोटो काढून उद्धवस्त करणार होते आयुष्य, गोमांस खाण्याचा आणि नमाज पढण्यासाठी टाकला दबाव...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:02 AM IST

9 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीने केला खुलासा.

 • बाडमेर- अंदाजे 9 महिन्यांपूर्वी बडौदासाठी निघून बेपत्ता झालेल्या युवतीच्या जम्मू-कश्मीरच्या युवकासोबत लग्न करण्यामध्ये नवीन गोष्टींचा खुलासा झाला आहे. 1 महिन्यांपूर्वी युवती परत आपल्या घरी बाडमेरला आली. तिने युवकावर गंभीर आरोप लावले आहेत.


  बाडमेरच्या एका कॅफेत काम करायचे युवक
  युवतीने सांगितले की, बाडमेरच्या एका कॅफेत काम करण्याऱ्या युवकाने तिचे अश्लील फोटो घेऊन तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. त्यानंतर तिला घाबरून जम्मूला बोलवले आणि तिथे खोट्या लग्नाच्या पेपरवर तिची साइन घेतली. तिथे तिच्यावर गोमांश खाणे आणि नमाज पढण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. युवकाच्या घरचे तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे आणि तिला दुबईला विकण्याचा प्लॅन त्यानी केला होता. याची भनक तिला लागली तेव्हा ती तेथून पळून आपल्या घरी परत आली.


  काय आहे प्रकरण ?
  महावीर चौक निवासी 18 वर्षीय युवती 16 मार्च 2018 ला बाडमेरवरून बड़ौदासाठी बसने निघाली होती. युवती मध्येच उतरली आणि अहमदाबादला गेली आणि तेथून जम्मूला गेली. कुटुंबीयांनी कुपवाडामध्ये राहणाऱ्या गुलजारवर बळजबरीने किडनॅपकरून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप लावला आहे. त्याच्या 38 दिवसानंतर युवकाने फेसबूकवरून एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात युवतीच्या सहमतिने लग्न केले असल्याचे सांगितले. युवतीच्या वडिलांनी न्यायालयात लग्नासाठी बनवलेल्या कागदपत्रांविरोधात अर्ज दाखल केला.


  मी दबावाखाली होते
  युवतीने सांगितले की, दोन वेळेस बाडनेर पोलिस श्रीनगरला गेले होते. तिथे गुलजारचा भाऊ पोलिसांत नोकरी करतो, त्यानं भेटूच नाही दिले. त्यानंतर युवतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून खोटं बोलवून घेण्यात आले. फेसबूकवरही जो व्हिडीओ बनवण्यात आला आहे त्याला दबावत बनवला आहे.


  दुबईत विकणार होते
  युनतीने नोव्हेंबर 2018 ला गुलजार आणि तिच्या भावाला बोलताना ऐकले की, ते दोघे तिला दुबईला विकणार होते. काही दिवसानंतर युवतीने गुलजारच्या खिशातून पैसे घेतले आणि फ्लाइटचे टिकीट काढले आणि जीव वाचवून जम्मूवरून पळून आपल्या घरी बाडनेरला आली.


Trending